ट्रेन नव्हे रुळांवरचे 5 स्टार हॉटल! भारताची सर्वात महागडी ट्रेन, तिकीटाची किंमत ऐकाल तर हादरुन जाल
भारतीय रेल्वेने दररोज अडीच कोटी लोक प्रवास करतात. भारतीय रेल्वेत आता वंदेभारत सारख्या आलिशान ट्रेन सामील झाल्या आहेत. तरीही याहूनही आलिशान ट्रेन भारतीय रेल्वे आयआरसीटीसीच्या मदतीने चालवत असते. ही ट्रेन रुळांवरचे जणू महालच असते.

The Maharajas Express: भारतीय रेल्वेच्या बाबतीत जेव्हा आपण आरामदायी ट्रेनचा विचार करतो तेव्हा आधी आपल्या नजरेसमोर राजधानी एक्सप्रेस यायची, त्यानंतर तेजस आणि वंदेभारत एक्स्प्रेस आपल्या डोळ्यासमोर येऊ लागल्या आहेत. परंतू आपल्या देशात एक ट्रेन आहे जिला चालते फाईव्ह स्टार हॉटल म्हटले जाते. आणि तिचे तिकीट लाखो रुपयांचे असते. या ट्रेनमधून परदेशी प्रवासी प्रवास करतात आणि शाही राजेशाही थाटात भारताचा इतिहास पाहातात. राजा महाराजांसारख्या सुविधा असलेल्या या ट्रेन संदर्भातील माहिती पाहूयात…
‘दि महाराजा एक्सप्रेस’ ही भारताची सर्वात महागडी ट्रेन म्हटली जाते. ही भारतीय रेल्वेची एक खास टुरिस्ट ट्रेन आहे.या ट्रेनमधून काही सर्वात सुंदर आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळांची टुर करण्यासाठी प्रवाशांना आकर्षित केले जाते. या ट्रेनचा प्रवास सर्वसाधारण रेल्वे प्रवासासारखा नाही तर संपूर्ण शाही अनुभव असतो.
एवढे तिकीट महाग का ?
या ‘दि महाराजा एक्सप्रेस’ ट्रेनचे तिकीट २० लाखांच्या आसपास असते. इतके महागडे तिकीट असल्याने या ट्रेनमध्ये सुविधा देखील त्याच दर्जाच्या दिल्या जातात. ही ट्रेन आतुन इतकी सुंदर आहे की तुम्हाला वाटेल कोणा राजमहालात तुम्ही बसला आहोता. प्रत्येक कोच शानदार पद्धतीने सजवलेला असतो. या ट्रेनमध्ये तुम्हाला चार वेगवेगळ्या लक्झरी कॅटगरीतून प्रवासाचा आनंद घेता येतो. य
1. डिलक्स केबिन
2. ज्युनियर स्युट
3. स्युट
4. प्रेसिडेंशियल स्युट (सर्वात आलीशान)
संपूर्ण पॅकेजचा खर्च
या तिकीटात केवळ ट्रेनचा प्रवास नाही तर संपूर्ण पॅकेजच्या खर्चाचा समावेश असतो. ज्यात प्रवासा दरम्यान फाईव्ह स्टार क्वालिटीचे जेवण, अल्कोहोल ड्रिंक्सची सुविधा, फिरण्याच्या जागी सर्वात लक्झरीयस हॉटेलात मुक्काम, सर्व फिरण्याचा बसचा आणि ट्रॅव्हलचा खर्च याचा यात समावेश असतो.
शाही सफरचा मार्ग
‘दि महाराजा एक्सप्रेस’ नेहमी ७ दिवस आणि ६ रात्रीचा प्रवास निश्चित करते. यात सुमारे २,७०० किलोमीटरचा प्रवास असतो. ही ट्रेनमध्ये मुख्य रुपाने भारताच्या त्या भागात धावते,जेथे आपल्या संस्कृती आणि इतिहासाची झलक पाहायला मिळते. या ट्रेनचा मार्ग नेहमी राजस्थान, उत्तर प्रदेश, आणि मध्य प्रदेशातील खास पर्यटन स्थळांना कव्हर करतो. या प्रवासात जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेले ताजमहल पाहायला मिळते. राजस्थानच्या जयपुर आणि उदयपूरचे शानदार किल्ले आणि महल पाहायला मिळतात. मध्य प्रदेशातील रणथंबोर नॅशनल पार्कात घनदाट जंगलात वाघांना पाहायचा थरारक अनुभव घेता येतो.
