Video | दरवाजा लॉक असल्यामुळे जागेवरच झाला ट्रॅप, चेन चोराचा पर्दाफाश, व्हिडीओ एकदा पाहाच

सध्या तर चोरीचा एक अतिशय थरारक व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण सराफा दुकानातून एक सोन्याचे चेन घेऊन पळतोय.

Video | दरवाजा लॉक असल्यामुळे जागेवरच झाला ट्रॅप, चेन चोराचा पर्दाफाश, व्हिडीओ एकदा पाहाच
THIEF VIRAL VIDEO

मुंबई : सोशल मीडियावर चोरी, हाणामारीचे काही व्हिडीओ हे नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. चोरी तसेच हाणामारीमध्ये थरारकता असते. कदाचित याच कारणामुळे हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या तर चोरीचा एक अतिशय थरारक व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण सराफा दुकानातून एक सोन्याची चेन घेऊन पळतोय. (thief trying to run by wearing gold chain video went viral on social media)

गळ्यात सोन्याची चेन घालून पळ काढण्याचा प्रयत्न

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा एका सराफा दुकानातील आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणाने सोन्याची चेन पळवण्याचा प्रयत्न केला आहे. सुरुवातीला हा तरुण दुकानमालकाने दिलेली चेन नीट न्याहाळतो आहे. तसेच आपल्या गळ्यात ही चेन कशी दिसू शकते हेही तो पाहतो आहे. त्यानंतर दुकानाचा मालक काही काळासाठी पलीकडे गेल्याचे व्हिडीओतील चोराने ताडले आहे. नंतर हीच योग्य वेळ असल्याचे समजत त्याने गळ्यातील चेनीसोबत पळ काढला आहे. पळ काढताना तो दरवाजापर्यंत जाऊन पोहोचला आहे.

चोर जागेवरच ट्रॅप झाला

मात्र, दरवाजा लॉक असल्यामुळे हा चोर जागेवरच ट्रॅप झाला आहे. त्याला काहीही करता येत नाहीये. उलट आपण पकडले गेल्यामुळे त्याने चुपचाच सोन्याची चेन वापस आणून दिली आहे. शेवटी या चोराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसे व्हिडीओमध्ये शेवटी दिसत आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, चोराच्या या मुर्खपणाच्या चोरीमुळे नेटकऱ्यांना चांगलेच हसू फुटले आहे. नेटकरी त्याच्या मुर्खपणाबद्दल विविध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. हा व्हिडीओ कुठला आहे याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, तो सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

इतर बातम्या :

Video | लाल रंगाच्या साडीमध्ये महिलेचा धडाकेबाज डान्स; हावभाव, ठुमक्यांमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ

Video | अस्वलाला पाहताच वाघला पळता भुई थोडी, घाबरून काढला पळ, व्हिडीओ एकदा पाहाच

Video : महिलेची दाजीसोबत मस्ती, भन्नाट डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

(thief trying to run by wearing gold chain video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI