Video | अस्वलाला पाहताच वाघला पळता भुई थोडी, घाबरून काढला पळ, व्हिडीओ एकदा पाहाच

हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. कारण एका अस्वलाला पाहून वाघाला पळता भूई थोडी झाली आहे. https://wordpress.org/support/article/excerpt/

Video | अस्वलाला पाहताच वाघला पळता भुई थोडी, घाबरून काढला पळ, व्हिडीओ एकदा पाहाच

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. प्राणी आणि पक्ष्याच्या व्हिडीओंना तर विशेष रुपाने पसंदी दिली जाते. याच पार्श्वभूमीवर सध्या एक आगळा-वेगळा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. कारण एका अस्वलाला पाहून वाघाला पळता भूई थोडी झाली आहे. (Tiger runs away after seeing Bear video went viral on social media)

वाघाने अस्वलावर थेट हल्ला चढवला

हा व्हिडीओ एका जंगलातील आहे. यामध्ये एक वाघ तसेच अस्वल दिसत आहेत. वाघ पाणी पिण्यासाठी आला असावा. पाणी पिऊन झाल्यानंतर तो आपल्या रस्त्याने जात आहे. मात्र, याच वेळी त्याचा सामना एका अस्वलाशी झाला आहे. अस्वलाने वाघाला पाहून त्याच्यावर थेट हल्ला चढवला आहे.

वाघाला पळता भुई थोडी झाली

वाघ तसेच सिंह हे जंगलातील सर्वांत हिंस्त्र आणि आक्रमक प्राणी आहेत असे म्हटले जाते. मात्र, अस्वलाला पाहून याच वाघाने पळ काढला आहे. अस्वलाने हल्ला करताच वाघ चांगलाच घाबरला आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, एरव्ही वाघाला पाहून सगळे सैरावैरा होतात. मात्र, या व्हिडीओमध्ये वाघानेच पळ काढल्यामुळे नेटकरी अवाक् झाले आहेत. हा व्हिडीओ पाहून नेटकरी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला अभिनेता रणदीप हुडाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले असून समर्पक असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडीओची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

इतर बातम्या :

Video : महिलेची दाजीसोबत मस्ती, भन्नाट डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Video | वडील म्हणाले आजपासून सिगारेट ओढणे बंद, पोराने लावलं भलतंच डोकं, पाहा नेमकं काय केलं ?

Video | मद्य लपवण्यासाठी लाकडांमध्ये बनवला फ्रिज, जबरदस्त जुगाड एकदा पाहाच

(Tiger runs away after seeing Bear video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI