Video | वडील म्हणाले आजपासून सिगारेट ओढणे बंद, पोराने लावलं भलतंच डोकं, पाहा नेमकं काय केलं ?

सध्या तर एक खळखळून हसायला लावणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये आपल्या वडिलांची आज्ञा माणणारा एक माणूस दिसतो आहे. सिगारेट ओढण्यासाठी त्याने लावलेले डोके पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

Video | वडील म्हणाले आजपासून सिगारेट ओढणे बंद, पोराने लावलं भलतंच डोकं, पाहा नेमकं काय केलं ?
smoking viral video

मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला रोजच वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतात. यातील काही व्हिडीओ तर अगदीच मजेदार असतात. लोकांनी केलेल्या विचित्र कारनाम्यांमुळे हे व्हिडीओ चर्चेचा विषय ठऱतात. सध्या तर एक खळखळून हसायला लावणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये आपल्या वडिलांची आज्ञा पाळणारा एक व्यक्ती दिसतो आहे. सिगारेट ओढण्यासाठी त्याने लावलेले डोके पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. (man smoking with plastic bottle video went viral on social media)

प्लास्टिकची बॉटल घेऊन ओढतोय सिगारेट

सध्या एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस आगळ्या-वेगळ्या पद्धतीने सिगारेट ओढत आहे. या व्यक्तीने प्लास्टिकच्या बॉटलच्या एका टोकाला सिगारेट अडकवली आहे. तर दुसऱ्या टोकाला तोंड लावून तो ही सिगारेट ओढतो आहे. सिगारेटला प्रत्यक्ष हात न लावता तो जोमात हवेत धूर फेकतो आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय.

सिगारेट ओढणाऱ्याचे मजेदार उत्तर

विशेष म्हणजे हा प्रकार कॅमेऱ्यात कैद केलेल्या व्यक्तीने सिगारेट ओढणाऱ्याला एक प्रश्न केला आहे. तू अशा पद्धतीने सिगारेट का ओढतोय ? असे त्याने विचारले आहे. त्याला सिगारेट ओढणाऱ्या माणसाने अतिशय मजेदार उत्तर दिले आहे. आजपासून सिगारेटला हात लावायचा नाही, असे माझ्या वडिलांनी सांगितले आहे, म्हणून मी अशा पद्धतीने सिगारेट ओढतोय, असे तो म्हणतोय.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by IDIOTIC SPERM (@idiotic_sperm)

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तीचे उत्तर ऐकून नेटकरी अवाक् झाले आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे समजू शकलेले नाही. मात्र, या व्हिडीओला ‘idiotic_sperm’ या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. या व्हिडीओची सध्या चांगलीच चर्चा आहे.

(टीप : टीव्ही 9 मराठी धुम्रपानाचे समर्थन करत नाही.)

इतर बातम्या :

Video | मद्य लपवण्यासाठी लाकडांमध्ये बनवला फ्रिज, जबरदस्त जुगाड एकदा पाहाच

Viral | उंच डोंगरावर झोका खेळण्याचा प्रयत्न, मध्येच पायात दोरी गुंतली, पुढे जे झालं ते एकदा पाहाच

जगातील तिसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत, पण राहतो जेमतेम 375 स्क्वेअर फूट घरात, पाहा फोटो

(man smoking with plastic bottle video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI