Video | मद्य लपवण्यासाठी लाकडांमध्ये बनवला फ्रिज, जबरदस्त जुगाड एकदा पाहाच

सध्या विदेशी लोकांचे असेच एक जबरदस्त जुगाड चर्चेत आले आहे. या माणसाने थेट लाकडांमध्ये एक फ्रिज लपवले आहे. या फ्रिजचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Video | मद्य लपवण्यासाठी लाकडांमध्ये बनवला फ्रिज, जबरदस्त जुगाड एकदा पाहाच

मुंबई : आपल्या देशात जुगाडू लोक बरेच आहेत. त्यांच्या डोक्यालिटीचे अनेक किस्से आपण यापूर्वी ऐकले आणि पाहिले असतील. मात्र, आपल्या देशातच नव्हे तर विदेशातही बरेच लोक हे आश्चर्यकारक पद्धातीने काही जुगाड करतात. त्यांच्या या करामतीचे किस्से नंतर कित्येक दिवस चर्चेत राहतात. सध्या विदेशी लोकांचे असेच एक जबरदस्त जुगाड चर्चेत आले आहे. या माणसाने थेट लाकडांमध्ये एक फ्रिज लपवले आहे. या फ्रिजचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (man made freeze in woods video went viral on social media)

माणसाकडून लाकडांची साठवणूक

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा काही सेकंदाचाच आहे. मात्र, यामध्ये जे दाखवण्यात आले आहे, ते अगदीच मजेदार आणि आश्चर्यकारक आहे. या व्हिडीओमध्ये एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाकूडफाटा साठवून ठेवण्यात आल्याचे आपल्याला दिसते आहे. येथे फक्त लाकडांची साठवणूक केलेली असावी असे आपल्याला प्रथमदर्शनी वाटते.

लाकडांमध्ये लपवला मोठा फ्रिज

मात्र, व्हिडीओमध्ये एक व्यक्ती आल्यानंतर सगळं काही बदललं आहे. त्याने लाकडांजवळ जाऊन एक दरवाजा उघडला आहे. हा दरवाजा उघडल्यानंतर लाकडामध्ये एक मोठा फ्रिज लपवल्याचे आपल्याला समजते आहे. तसेच या फ्रिजमध्ये काही बॉटल्ससुद्धा दिसत आहेत. या बॉटल्समध्ये मद्य असावे असा अंदाज बांधला जातोय.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, बॉटल लपवण्यासाठी लाकडांमध्ये एक फ्रिज तयार केल्यामुळे लोकांना हा व्हिडीओ चांगलाच आवडला आहे. नेटकरी हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात लाईक करत आहेत. तसेच माणसाच्या या जुगाडू वृत्तीचेही नेटकरी कौतूक करत आहेत. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

इतर बातम्या :

Viral | उंच डोंगरावर झोका खेळण्याचा प्रयत्न, मध्येच पायात दोरी गुंतली, पुढे जे झालं ते एकदा पाहाच

जगातील तिसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत, पण राहतो जेमतेम 375 स्क्वेअर फूट घरात, पाहा फोटो

Video | पेटलेला गॅस सिलिंडर घेऊन नदीकडे धाव, आग विझविण्यासाठी दाखवलेली हिम्मत एकदा पाहाच

(man made freeze in woods video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI