VIDEO | पक्ष्याचा जोडीदाराचा रस्त्यावर मृत्यू, साथीदाराच्या मृत्यूनंतर पक्ष्याने केले असे काही की तुम्हालाही रडू कोसळेल!

आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर आपले मित्र, नातेवाईक किंवा इतर जवळचे व्यक्ती आपले सांत्वन करण्यासाठी येतात.

VIDEO | पक्ष्याचा जोडीदाराचा रस्त्यावर मृत्यू, साथीदाराच्या मृत्यूनंतर पक्ष्याने केले  असे काही की तुम्हालाही रडू कोसळेल!
bird death

नवी दिल्ली : जेव्हा आपल्या आयुष्यात असलेल्या जोडीदाराचा मृत्यू होतो, तेव्हा माणूस पूर्णपणे तुटतो, असे म्हटले जाते. फक्त माणूस नव्हे तर प्रत्येक सजीव मग ते पशूपक्षी किंवा इतर कोणीही असो… तो या काळात मानसिकरित्या पूर्णपणे खचून जातो. आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर आपले मित्र, नातेवाईक किंवा इतर जवळचे व्यक्ती आपले सांत्वन करण्यासाठी येतात. माणसांप्रमाणे प्राणी किंवा पक्षीही या कठीण काळात एकमेकांचे सांत्वन करतात. नुकतंच अशाच घडलेल्या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एका पक्षाचे त्याचे इतर साथीदार सांत्वन करत आहेत. (This bird drowned in mourning when the Partner died Video Viral social media)

व्हिडीओत नेमकं काय? 

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत पोपटाप्रमाणे हुबेहुब दिसणाऱ्या एका पक्ष्याचा जोडीदाराचा मृत्यू झाल्याचे दिसत आहे. त्यानंतर तो पक्षी त्याच्या आजूबाजूला फिरताना, तसेच धावताना दिसत आहे. तसेच चोचीने आपल्या जोडीदाराला उठवण्याचा प्रयत्न ही करत आहे. मात्र त्याच्या जोडीदार पक्ष्याचा मृत्यू झाल्याने तो निपचित रस्त्यात पडल्याचे दिसत आहे. हे चित्र पाहिल्यानंतर त्याचे इतर साथीदार त्या ठिकाणी गर्दी करतात. त्याचे सांत्वन करतात. तसेच यावेळी सर्व पक्षी शोकसभा असल्याप्रमाणे एका रांगेत उभे राहतात. यावेळी त्या मृत पक्षाला श्रद्धांजली देत असल्याचाही भास होतो.

सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना अश्रू आवरता आले नाही. यावर अनेकांनी भावनिक कमेंट्सही दिल्या आहेत. मला हे दृश्य पाहून अश्रू आवरता आले नाही, असे एका युजरने म्हटले आहे. तर या व्हिडीओने माझ्या हृदयाला स्पर्श केला, असे दुसऱ्या युजरने म्हटले आहे. इतकंच नव्हे तर अनेक युजर्सने यावर भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

नेटकऱ्यांकडून व्हिडीओवर लाईक्सचा पाऊस 

हा भावनिक व्हिडीओ भारतीय वनसेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. ऑस्ट्रेलियन गाला, ज्याला गुलाबी किंवा ग्रे कॉकटू या नावाने ओळखले जाते तो आपल्या जोडीदाराच्या मृत्यूने दु:खी आहे. त्याला शेवटचा निरोप पाहताना निश्चितच तुम्हाला दु:ख होईल. या व्हिडीओ आतापर्यंत 73 हजाराहूंन अधिक व्यक्तींनी बघितला आहे. तर याला व्हिडीओला 6500 हून अधिक लाईक्स आणि दीड हजारांहून अधिक जणांनी रिट्वीट केले आहे.

पाहा व्हिडीओ

(This bird drowned in mourning when the Partner died Video Viral social media)

संबंधित बातम्या : 

Video | Swiggy फूड डिलिव्हरी बॉयचे जबरदस्त स्केटिंग, जेवण पोहोचवण्यासाठी मोठी कसरत, व्हिडीओ एकदा पाहाच

VIDEO : वरमाला घालताच नवरदेवाचा पायजमा निसटला, पुढे काय झालं?; हा व्हायरल व्हिडीओ पाहाच!

रेल्वे स्थानकावर कोसळलेल्या आईला वाचवण्याची तळमळ, 2 वर्षीय चिमुकलीने असं काय केलं की सगळीकडे चर्चा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI