Video : गंडवलं रे गंडवलं! शिकारीसाठी वाघ पाण्यात उतरला पण बदकाने खतरनाक चकवा दिला, पाहा व्हीडिओ…

हा व्हीडिओ Buitengebieden या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आलं आहे. या व्हीडिओला बदक विरूद्ध वाघ, असं कॅप्शन दिलं आहे. हा व्हीडिओ साडे चार मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

Video : गंडवलं रे गंडवलं! शिकारीसाठी वाघ पाण्यात उतरला पण बदकाने खतरनाक चकवा दिला, पाहा व्हीडिओ...
| Edited By: | Updated on: Jun 09, 2022 | 6:06 PM

मुंबई : सोशल मीडियावर वाघाचे अनेक व्हीडिओ पाहिले असतील. त्याला शिकार करताना पाहिलं असेल. पण वाघाची (Tiger) अशी शिकार आणि त्याची झालेली फसगत कधीही पाहिली नसेल. एक वाघ बदकाची (Duck) शिकार करण्यासाठी अगदी पाण्यात जातो. दबी धरून पाण्यात उभा असतो. बदक बेसावध असल्याचं वाटताच तो थोडा पुढे सरसावतो पण काही क्षणात बदक सावध होतं. अन् पुढे हे बदक जे करतं ते आश्चर्यजनक आहे.

व्हायरल व्हीडिओ

एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक वाघ बदकाची शिकार करण्यासाठी अगदी पाण्यात जातो. दबी धरून पाण्यात उभा असतो. बदक बेसावध असल्याचं वाटताच तो थोडा पुढे सरसावतो पण काही क्षणात बदक सावध होतं. अन् पुढे हे बदक जे करतं ते आश्चर्यजनक आहे.

वाघ आपल्या दिशेने येतोय हे लक्षात येताच हे बदक पाण्यात डुबकी घेतं अन् गायब होतं पुढं काही क्षणात ते दुसऱ्या बाजूला पाण्याच्या बाहेर निघतं. त्याचा हा चकवा वाघालाही अनपेक्षित होता. वाघ कावरा बावरा होऊन बदकाला शोधत राहातो. हा केवळ दहा सेकंदाचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हीडिओ Buitengebieden या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आलं आहे. या व्हीडिओला बदक विरूद्ध वाघ, असं कॅप्शन दिलं आहे. हा व्हीडिओ साडे चार मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर दोन लाख 25 हजारांहून अधिक लोकांनी याला लाईक केलंय. तर तीन हजार लोकांनी कमेंट आणि 38 हजारांहून अधिकांनी रिट्विट केलंय.

यावर काहींनी कमेंट केली आहे. “बदकं वाघांपेक्षा हुशार असतात”, असं एकाने म्हटलंय. दुसऱ्याने लिहिलं की, “बदक इतका आत्मविश्वासी आहे की त्याने उडण्याचीही तसदी घेतली नाही. त्याने एका बाजूने निवांतपणे पाण्यात डुबकी मारली आणि तो दुसऱ्या बाजूने बाहेर आला”, असं दुसऱ्याने म्हटलंय.