संपूर्ण जग तीन दिवस अंधारात जाणार, उजेडाची भीती वाटणार,अचंबित करणारा दावा कुणी केला?

संपूर्ण जग तीन दिवस अंधारात जाणार, उजेडाची भीती वाटणार,अचंबित करणारा दावा कुणी केला?
Earth

काही लोक टाईम ट्रॅव्हलर म्हणजेच काळाच्या पुढे किंवा मागे जाऊन आल्याचा दावा करत असतात. time traveller world darkness

Yuvraj Jadhav

|

May 06, 2021 | 1:46 PM

नवी दिल्ली: सोशल मीडियावर काही लोक टाईम ट्रॅव्हलर म्हणजेच काळाच्या पुढे किंवा मागे जाऊन आल्याचा दावा करत असतात. हे लोक त्याद्वारे काही दावे देखील करत असतात. एका टिकटॉक वापरकर्त्यानं असाच एक दावा केला आहे. 2026 मध्ये 6 जूनला तीन दिवसांसाठी संपूर्ण जग अंधारात लोटलं जाईल, असंही त्यानं म्हटलं आहे. @timetraveler2582 असं त्या वापरकर्त्याचं नाव आहे. त्यानं 2582 या वर्षापर्यंत जाऊन आल्याचा दावा केला आहे. (Tiktok user time traveller 2582 claims for three days world will be in darkness)

जग अंधारात जाण्याचा दावा, फॉलोअर्सची संख्या वाढली

टिकटॉक वापरकर्ता @timetraveler2582 यानं 561 वर्ष पुढे जाऊन आल्याचा दावा केला. यादाव्यानंतर त्यानं आणखी एक दावा केलाय. हा दावा मात्र हैराण करणारा आहे. 6 जून 2026 ला तीन दिवसांसाठी संपूर्ण जग अंधाराच्या छायेत जाईल. लोकांना त्यावेळी कुठेही प्रकाश दिसणार नाही, असं त्यानं म्हटलंय. यानंतर त्याच्या फॅन आणि फॉलोअर्सची संख्या मात्र वेगानं वाढली आहे.

अंधार होण्याचा केवळ दावा, पुराव्यांच्या नावानं…

टाईम ट्रॅव्हलर @timetraveler2582 यानं 6 जून 2026 ला संपूर्ण जग अंधारात लोटण्याचा दावा तर केला आहे. पुढील पाच वर्षात जगात बदल होतील, असं तो म्हणतोय. मात्र, त्या व्यक्तीनं त्याच्या दाव्याबाबत एकही पुरावा दिलेला नाही. यापुढे त्यानं त्यावेळी जगात प्रकाश किंवा उजेडाकडं पाहण्यासाठी देखील परवानगी नसेल. कोणत्याही उजेड पसरवणाऱ्या गोष्टी वापरण्यास मंजुरी नसेल. त्यावेळी केवळ मेणबत्तीच्या वापराला परवानगी असेल, असं तो म्हणाला.

लोकांकडून प्रश्नांची सरबत्ती

टाईम ट्रॅव्हलरच्या प्रश्नांनी काही लोकांनी त्याला सोशल मीडियावर फॉलो केलं. मात्र, सर्वांना अचंबित करणाऱ्या दाव्यामुळे हैराण झालेल्या लोकांनी त्यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. यापूर्वी देखील अनेक टाईम ट्रॅव्हलर्सनी अनेक दावे केले होते. त्यांच्या दाव्यांनी लोक काही वेळा हैराण झाले आहेत.

संबंधित बातम्या

Video: स्कूटीवाल्या महिलेचा हाय व्होल्टेज ड्रामा, मास्क घातलाय हेल्मेट घालणार नाही, पोलिसांवरच भडकली

VIDEO : पक्षी असो किंवा माणूस, आई तर शेवटी आईच, दुष्ट कावळ्याच्या तावडीतून पिलाला सोडवण्यासाठी थेट भिडली

(tiktok user time traveller 2582 claims for three days world will be in darkness)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें