VIDEO : पक्षी असो किंवा माणूस, आई तर शेवटी आईच, दुष्ट कावळ्याच्या तावडीतून पिलाला सोडवण्यासाठी थेट भिडली

या जगात आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही. आईचं आपल्या मुलांप्रती असणारं प्रेम शब्दांमध्ये कधीच मांडता येणार नाही (Viral Video of fight between bird and crow to rescue child)

VIDEO : पक्षी असो किंवा माणूस, आई तर शेवटी आईच, दुष्ट कावळ्याच्या तावडीतून पिलाला सोडवण्यासाठी थेट भिडली
पिलासाठी नडली आणि थेट भिडली, दुष्ट कावळ्यापासून अखेर सुटका

मुंबई : या जगात आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही. आईचं आपल्या मुलांप्रती असणारं प्रेम शब्दांमध्ये कधीच मांडता येणार नाही. आपला मुलगा अडचणीत किंवा संकटात आहे, अशी तिला माहिती मिळाली तर ती हातातील सर्व कामं सोडून मुलाला त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी धावून जाते. लेकराला वाचवण्यासाठी माणूसच काय पक्षीही कितीही मोठं बलिदान देऊ शकतात. असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. याबाबतचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक पक्षी आपल्या पिलाला दुष्ट कावड्याच्या तावडीतून कसं सोडवतं ते एकदम मार्मिकपणे दिसत आहे (Viral Video of fight between bird and crow to rescue child).

व्हिडीओत नेमकं काय ?

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत एका आईचा पिलासाठी कशाप्रकारे जीव तुटतो ते बघायला मिळतंय. आपल्या पिलाला संकटातून दूर लोटण्यासाठी आई कुणालाही नडू शकते ते या व्हिडीओतून दिसत आहे. व्हिडीओत एक दुष्ट कावळा एका पक्ष्याच्या पिलाला पकडतो. तो त्या पिलावर पायाचा पंजा टाकून उभा राहतो. कावळा पिलाच्या अंगावर उभा राहिल्याने ते पिल्लू ओरडायला लागतं. त्यावेळी त्या पिलाची आई तिथे येते.

पिलाची आई वेळेचा विलंब न करता थेट कावळ्यावर तुटून पडते. विशेष म्हणजे संबंधित पक्षी कावळ्यापेक्षा खूप लहान होतं. मात्र, आपल्या क्षमतांचा विचार न करता त्या पिलाची आई थेट कावळ्यावर तुटून पडते. यावेळी कावळा आणि तिच्यात प्रचंड संघर्ष होतो. या कावळ्याच्या बरोबर आणखी एक कावळा उभा असतो. पिलाच्या आईचं आणि कावळा यांच्यातील भांडण सुरु असताना दुसरा कावळा पिलावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, पिलाची आई त्याच्यावरही धावून जाते. तेव्हा तो कावळा तिथून धूम ठोकतो.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओला इन्स्टाग्रामवर dbiniou या नावाच्या प्रोफाईलवर शेअर करण्यात आला आहे. लोक या व्हिडीओला फक्त शेअर करत नाहीयत तर वेगवेगळ्या भावनिक कमेंटही देत आहेत. व्हिडीओतील छोट्या पक्षाची हिंमत बघून अनेकांना आश्चर्य वाटतंय. शेवटी आई तर आईच असते, अशी प्रतिक्रिया अनेकजण व्हिडीओ बघितल्यानंतर देत आहेत (Viral Video of fight between bird and crow to rescue child).

व्हिडीओ बघा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Dominique Biniou II (@dbiniou)

हेही वाचा : Video | महागडी दारु, खमंग चकणा, महिलांच्या ‘ओल्या पार्टीची’ थेट आयपीएस अधिकाऱ्याकडून दखल, व्हिडीओ व्हायरल