AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: तिरुपतीच्या पुरात फसलेल्या पुजाऱ्याला ट्रॅफिक पोलिसाने वाचवलं, शूरवीर पोलिसाचं नेटकऱ्यांकडून कौतुक

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की पुराच्या वेळी पुजारी अडकतात आणि मदतीसाठी ओरडतात आणि त्यानंतर तिथे कर्तव्यावर असलेले सीआय श्री नायक त्यांना मदत करण्यासाठी पाण्याशी झुंज देत दोरीच्या सहाय्याने त्यांच्यापर्यंत पोहोचतात.

Video: तिरुपतीच्या पुरात फसलेल्या पुजाऱ्याला ट्रॅफिक पोलिसाने वाचवलं, शूरवीर पोलिसाचं नेटकऱ्यांकडून कौतुक
पुजाऱ्याची पुरातून सुटका
| Edited By: VN | Updated on: Nov 23, 2021 | 2:03 PM
Share

सध्या दक्षिण भारतातील कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाने कहर केला आहे. तिरुपतीहून समोर येत असलेल्या व्हिडीओंमध्ये शेकडो यात्रेकरू भीषण पुरात अडकल्याचे दिसत आहे. घाट रोड आणि तिरुमला हिल्सचे रस्ते बंद आहेत. या जागांशी संबंधित अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यासंबंधीचा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. ज्याचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की पुराच्या वेळी पुजारी अडकतात आणि मदतीसाठी ओरडतात आणि त्यानंतर तिथे कर्तव्यावर असलेले सीआय श्री नायक त्यांना मदत करण्यासाठी पाण्याशी झुंज देत दोरीच्या सहाय्याने त्यांच्यापर्यंत पोहोचतात. आणि आपल्या जीवाची बाजी लावत पुजाऱ्याचे प्राण वाचवतात.

पाहा व्हिडीओ

आंध्र प्रदेश पोलिसांनी बचावकार्याचा हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. जो सध्या व्हायरल होत आहे. ज्याला बातमी लिहिपर्यंत 6 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. याशिवाय सोशल मीडिया यूजर्सही या तरुणाचे कौतुक करत आहेत.

या पोलीस अधिकाऱ्याचे लोकांकडून कौतुक होत आहे. या व्हिडिओवर अनेक युजर्सनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. एका यूजरने कमेंट करत लिहिले, ‘इन्स्पेक्टरचे धाडस वाखाणण्याजोगे आहे’ दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘पोलिसांच्या या प्रतिमेला कोणीही दाखवत नाही… अशा धाडसी अधिकाऱ्याला सलाम, आणखी एका यूजरने कमेंट करत लिहिले की, ‘शूर पोलीस हवालदार, त्याला पुरस्कार मिळायला हवा. या व्हिडिओवर हजारो लाईक्स आणि कमेंट्सही पाहायला मिळत आहेत.

हेही पाहा:

ज्युसर खाली ग्लास ठेवायला विसरला ‘खली’, 2 संत्रीचा ज्यूस काढल्यानंतरही ग्लास खालीच, पाहा भन्नाट Video!

Video: दमदार दाढीची कमाल, 63 किलो महिलेला दाढीने उचलून झाला मालामाल, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव!

 

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली