AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | अभ्यास करताना मोबाईल वापरण्यासाठी मुलाने केला जुगाड

TRENDING VIDEO | सध्या एका मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्या मुलाने अभ्यास करीत असताना मोबाईल चालवण्यासाठी एक जुगाड केला आहे. तो लोकांना अधिक आवडला आहे.

VIDEO | अभ्यास करताना मोबाईल वापरण्यासाठी मुलाने केला जुगाड
student viral videoImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 28, 2023 | 8:00 AM
Share

मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) रोज असंख्य व्हायरल व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. ज्या लोकांना जुगाड व्हिडीओ (Jugaad Video) पाहायचा आहे. त्यांच्यासाठी हा व्हिडीओ अधिक चांगला आणि खास अशा पद्धतीचा आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना मजा आली आहे. सगळ्यात लहान मुलांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना आपल्या लहानपणाची आठवण झाली आहे. सध्या या व्हिडीओची सोशल मीडियावर (Trending Video) अधिक चर्चा आहे. त्या मुलाला अनेक नेटकऱ्यांनी स्मार्ट बॉय असं म्हटलं आहे.

ते कुटुंबाला वेळ देत नाहीत

सध्या पालकांची मुलांच्याबाबत एक तक्रार असते, ती म्हणजे, त्यांचा मुलगा नेहमी मोबाईल हातात घेऊन बसतो. याचं खरं कारण म्हणजे त्यांचे आईवडील स्वत: मोबाईलमध्ये व्यस्त असतात. ते कुटुंबाला वेळ देत नाहीत. परंतु काही पालक असे असतात की, त्यांच्या मुलावरती ते अधिक लक्ष देऊन असतात. त्यांच्या मुलांकडून अभ्यास करून घेतात. परंतु सध्याची मुलं इतकी चतुर आहेत, की काहीना काही त्यातून सुध्दा जुगाड शोधून काढतात. मुलांनी केलेला जुगाड त्यांच्या आई वडिलांना अजिबात माहित नसतो.

ज्यावेळी त्याची आई दरवाजा उघडते

व्हिडीओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की, एक मुलगा टेबलवरती मजेशीर अभ्यास करीत आहे. त्यांच्या समोर असलेल्या भिंतीला एक दोरी बांधली आहे. तिथं मोबाईल लटकला आहे. त्या मुलाचं सगळं लक्ष त्या मोबाईलकडे आहे. त्याचवेळी त्याची आई तिथं येते. ज्यावेळी त्याची आई दरवाजा उघडते. त्यावेळी त्या मुलाचा मोबाईल तिथं असलेल्या टॉवेलच्या पाठीमागे जात आहे. त्या मुलाच्या आईला हा प्रकार अजिबात समजत नाही.

हा व्हिडीओ एक्स ट्विटरवरती @TheFigen_ नावाच्या खात्यावरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे. त्यावरती लोकं मजेशीर कमेंट करीत आहेत.

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.