Viral video | जंगलात आईपासून विभक्त झाले हत्तीचे पिल्लू, इकडे-तिकडे पळून शोधत होता आईला

आई आणि मुलाचे नाते खूप मजबूत आणि सुंदर असते. कोणतेही मूल किंवा कोणतीही आई एकमेकांशिवाय जगू शकत नाही. असे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप दिसतात. आता अलीकडेच आणखी एक किस्सा समोर आला आहे. ज्यात मनुष्य नाही तर एका हत्तीचे पिल्लू त्याच्या आईपासून विभक्त झाला आहे. हा व्हिडीओ सर्वांना अतिशय आकर्षक वाटत आहे.

Viral video | जंगलात आईपासून विभक्त झाले हत्तीचे पिल्लू, इकडे-तिकडे पळून शोधत होता आईला
Baby Elephant

मुंबई : आई आणि मुलाचे नाते खूप मजबूत आणि सुंदर असते. कोणतेही मूल किंवा कोणतीही आई एकमेकांशिवाय जगू शकत नाही. असे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप दिसतात. आता अलीकडेच आणखी एक किस्सा समोर आला आहे. ज्यात मनुष्य नाही तर एका हत्तीचे पिल्लू त्याच्या आईपासून विभक्त झाला आहे. हा व्हिडीओ सर्वांना अतिशय आकर्षक वाटत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये हे पाहिले जाऊ शकते की हत्तीचे पिल्लू त्याच्या आईपासून वेगळे होते. अशा परिस्थितीत वन अधिकारी त्या पिल्लुची त्याच्या आईशी भेट करुन देण्यासाठी आणि त्याच्या आईला शोधण्यासाठी जंगलात फिरताना दिसत आहेत.

व्हिडिओमध्ये वन विभागाचे अनेक अधिकारी जंगलात दिसत आहेत. एक हत्तीचे पिल्लू त्यांच्यासोबत चालत आहे. व्हिडिओमध्ये ते सर्व अधिकारी हत्तीच्या बाळाला मदत करत आहेत. हा व्हिडिओ आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. आता हा व्हिडिओ इतर सोशल मीडिया पेजेसवर पाहिला जात आहे.

हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, ‘मुदुमलाईमध्ये तामिळनाडू फॉरेस्टर्सने बचाव केल्यानंतर एका हत्तीच्या पिल्लुची त्याच्या कुटुंबाशी पुन्हा भेट करवून दिली. खरंच, हे हृदयस्पर्शी आहे. खूप कौतुक. एका व्हिडिओमध्ये ते पिल्लू खूप वेगाने धावत असल्याचं पाहायला मिळत आहे.

लोक या व्हिडिओवर बऱ्याच प्रतिक्रिया देत आहेत. एका वापरकर्त्याने कमेंट केली आणि लिहिले की, ‘खूप गोंडस बाळ आहे. वन अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे वन्य प्राणी जिवंत आहेत, अन्यथा शिकारी त्यांना कधीच मारतील? याला उत्तर देताना दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, ‘हा खरोखर एक उत्तम व्हिडिओ आहे.’ तसेच, काही जण म्हणतात की मुलाप्रमाणेच आई सुद्धा खूप अस्वस्थ असेल.

संबंधित बातम्या :

VIDEO | अस्वलाला कॅमेरा सापडला आणि त्याने त्याच्यासोबत जे केलं ते पाहून नेटकरी आवाक

Video | घोड्यावर उभे राहत पैसे उधळले, पण मध्येच घोळ झाला, नवरदेवासह माणसाची चांगलीच फजिती, व्हिडीओ व्हायरल

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI