AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनोखा समुद्री जीव व्हायरल, क्षणार्धात होतो पारदर्शक, तुम्ही पाहिला का ? Video

रीफ स्क्विड नावाच्या सागरी प्राण्याचा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरील एका पेजवर शेअर झालेला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये असे म्हटले आहे की तीन विशेष प्रकारच्या पेशींच्या समन्वयामुळे हा प्राणी क्षणार्धात पारदर्शक बनतो.

अनोखा समुद्री जीव व्हायरल, क्षणार्धात होतो पारदर्शक, तुम्ही पाहिला का ? Video
Reef Squid
| Updated on: Aug 01, 2025 | 10:31 PM
Share

तुम्ही अशा कोणत्याही सजीवा संदर्भात ऐकले आहे की तो सेकंदात पाण्यात दिसेनासा होतो. अवघ्या काही सेकंदात पारदर्शक होतो. सोशल मीडियावर अलिकडे असा एक समुद्री जीव व्हायरल झाला आहे, त्याला पाहून अनेक नेटिजन्सना डोके गरगरले आहे आणि त्यांना त्यांच्या डोळ्यांवरच विश्वास बसत नाहीए. रीफ स्क्विड (Reef Squid) नामक हा समुद्री प्राणी ऑक्टोपससारखा दिसतो. त्याच्या त्वचेतील काही पेशींच्या मदतीने काही सेंकदात तो पारदर्शक होतो. या प्राण्याचा व्हिडीओ आश्चर्यकार आहे. हा व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे.

रीफ स्क्विड नावाच्या सागरी सजीवाचा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरील @detailedexplanation या एका पेजवर शेअर झालेला आहे. या पोस्टवर एक कॅप्शन लिहीली असून त्यावर लिहीले आहे की तीन विशेष प्रकारच्या पेशींच्या समन्वयामुळे हा प्राणी क्षणार्धात पारदर्शक बनतो.

रीफ स्क्विड या अनोख्या प्राण्याची क्षमता त्याच्या त्वचेत आढळणाऱ्या तीन खास प्रकारच्या पेशींच्या क्रोमैटोफोर्स (Chromatophores), इरिडोफोर्स (Iridophores), आणि ल्यूकोफोर्स (Leucophores)मध्ये आहे. माहितीनुसार या तीन पेशी मिळून रंग, चमक आणि प्रकाशाला सजीवाच्या आरपार जाण्याची प्रक्रीया नियंत्रित करते.

येथे पाहा पोस्ट –

क्रोमैटोफोर्स पेशी लाल, पिवळा आणि करड्या रंगासारख्या असतात. स्क्विड आपल्या स्नायूंच्या मदतीने या रंगाच्या थैलीला पसरवू किंवा आकुंचन करु शकते. जेव्हा थैली पसरते तेव्हा हे रंग दिसतात. आणि जेव्हा या पेशी आक्रसतात तेव्हा रंग लपला जातो. ज्यामुळे हा प्राणी पारदर्शक होतो.

जेव्हा क्रोमैटोफोर्स आक्रसतात तेव्हा इरिडोफोर्स पेशी एक्टीव्ह होतात. या चमकदार पेशी असतात, ज्या ‘रिफ्लेक्टिन’ नामक प्रोटीनचा उपयोग करून प्रकाशाला दर्शवते.हे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकाशाला दर्शवण्यासाठी आपल्या अंतर्गत बनावटीला बदलू शकतात. ज्यामुळे स्क्विड देखील चमकदार तर कधी पारदर्शक होतो.

ल्यूकोफोर्स, पेशी प्रकाशाला पसरवण्याचे काम करीत असतात. या आजूबाजूच्या चमकची नक्कल करीत स्क्विडला आणखीन पारदर्शक बनवण्याचे काम करतात.

लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.