Bus Break Fail: ब्रेक फेल झाल्याने बस डायरेक्ट पेट्रोल पंपात घुसली; UP मधील थरारक अपघात CCTV कॅमेऱ्यात कैद

उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील एका पेट्रोल पंपावर हा थरारक अपघात घडला आहे. बसचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडला. भरधाव बसने पेट्रोल पंपावरील वाहनाला धडक दिली. यामुळे हा तिहेरी अपघात झालाय. या अपघातात पेट्रोल पंपाचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातानंतर बस चालक फरार झाल्याची माहिती पेट्रोल पंप चालकाने दिली.

Bus Break Fail: ब्रेक फेल झाल्याने बस डायरेक्ट पेट्रोल पंपात घुसली; UP मधील थरारक अपघात CCTV कॅमेऱ्यात कैद
वनिता कांबळे

|

Jul 21, 2022 | 5:30 PM

बिजनौर : कर्नाटक मध्ये एका रुग्णवाहिकेला झालेल्या अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल झाला असतानाच आता बिहारमधील एका डेंजर अपघाताचा(accident) व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पेट्रोल पंपावर झालेला हा भयानक अपघात तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.ब्रेक फेल(Break Fail) झाल्याने उत्तर प्रदेश परिवहन विभागाची बस (UP Roadways Bus) डायरेक्ट पेट्रोल पंपात घुसली. यानंतर पिकअप टेम्पो आणि कार एकमेकांना धडकले. या अपघातात तीन ते चार जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

बसचे ब्रेक फेल झाल्याने झाला अपघात

उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील एका पेट्रोल पंपावर हा थरारक अपघात घडला आहे. बसचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडला. भरधाव बसने पेट्रोल पंपावरील वाहनाला धडक दिली. यामुळे हा तिहेरी अपघात झालाय. या अपघातात पेट्रोल पंपाचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातानंतर बस चालक फरार झाल्याची माहिती पेट्रोल पंप चालकाने दिली.

बस पेट्रोल पंपात घुसल्याने झाला तिहेरी अपघात

पेट्रोल पंपावर अनेक वाहने पेट्रोल भरण्यासाठी थांबली होती. यावेळी एका भर धाव बसने पेट्रोल पंपावर इंधन भरत असलेल्या पिकअप ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, या पिकप टेम्पोने बाजूला इंधन भरत असलेल्या कारला धडक दिली. अशा प्रकारे हा तिहेरी अपघात झाला.

असलेल्या पेट्रोल आणि डिझेल भरणारे यंत्र कारवर कोसळले

बसने धडक दिल्यानंतर कार आणि पिक टेम्पोच्या मध्ये असलेल्या पेट्रोल आणि डिझेल भरणारे यंत्र कारवर कोसळले. यात पेट्रोलपंप चालकाचे मोठे नुकसान झाले आहे. ही धडक इतकी जोरदार होती की पिकअपचा ड्रायव्हर बाहेर फेकला गेला. पिकअप ड्रायव्हर या अपघातात गंभीर जखमी झाला आहे.

बसचा ड्रायव्हर फरार झाला

बसचे ब्रेक फेल झाल्याने ड्रायव्हरचे बस वरील नियंत्रण सुटले आणि त्याने पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या वाहनांना धडक दिली. या अपघातानंतर पेट्रोल पंपावर एकच गोंधळ उडाला. या घटनेनंतर पेट्रोल चालकाने येथून पळ काढला. उत्तर प्रदेश सरकार परिवहन विभागाची ही बस असल्याचे समजते.

कर्नाटकमधील उडिपी टोल नाक्यावर भीषण अपघात

कर्नाटक(Karnataka ) मध्ये एका ॲम्ब्युलन्सला(Ambulance) भीषण अपघात झाला आहे. कर्नाटकमधील उडिपी टोल नाक्यावर(toll gate) हा अपघात झाला आहे. या अपघाताचा थरार टोल नाक्यावरील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ॲम्बुलन्स टोल कलेक्शन चेक पोस्टला जाऊन धडकल्याचे व्हिडिओत दिसत आहे. ही धडक इतकी भीषण होती की ॲम्बुलन्स रस्त्याच्या कडेला जाऊन पडली. भरधाव वेगात असलेल्या या अँम्ब्युलन्सने कर्मचाऱ्यांना उडवले. या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. ही ॲम्बुलन्स एका रुग्णाला घेऊन निघाली होती.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें