रामदेव बाबांच्या रेसवर हसला, अब्जाधीशाने टोचलं स्वत: घोड्याचं इंजेक्शन; पुढे काय घडलं?

ब्रायन जॉनसन या अब्जाधीशाने घोड्यांना बेहोश करणाऱ्या केटामिन इंजेक्शनचा प्रयोग स्वतःवर केला. यामुळे त्यांच्या मेंदूतील क्रियाकलाप बदलले. त्यांनी याचा रामदेव बाबांच्या फिटनेस आणि त्यांनी घोड्याशी केलेल्या शर्यतीशीही संबंध जोडला. केटामिनमुळे मेंदूची लवचिकता वाढून नवीन विचारांना वाव मिळतो, असा त्यांचा दावा आहे.

रामदेव बाबांच्या रेसवर हसला, अब्जाधीशाने टोचलं स्वत: घोड्याचं इंजेक्शन; पुढे काय घडलं?
| Updated on: Feb 21, 2025 | 12:35 PM

योग गुरू रामदेव बाबांच्या फिटनेसची नेहमी चर्चा होत असते. त्यांच्याकडून हजारो लोक फिटनेसचे धडेही घेत असतात. काही दिवसांपूर्वी रामदेव बाबांनी घोड्यासोबत धावण्याची शर्यत लावली होती. त्यावर अमेरिकेचा अब्जाधीश ब्रायन जॉनसन हा रामदेव बाबांवर हसला होता. त्यानंतर मात्र त्याने स्वत:वर एक अजब प्रयोग केला. त्याने प्रयोगाचा भाग म्हणून स्वत:लाच घोड्याचं इंजेक्शन टोचून घेतलं. घोड्यांना बेशुद्ध करण्यासाठी हे इंजेक्शन दिलं जातं. त्यानंतर जे घडलं ते वेगळंच होतं. ब्रायन यांनी मध्यंतरी त्यांचं बायोलॉजिकल वय कमी केल्याचा दावा केला होता. त्यामुळे ते चर्चेत आले होते.

ब्रायन जॉनसन सध्या भारतात चर्चेत आहेत. त्यांनी अब्जाधीश निखिल कामत यांचे पॉडकास्ट अर्ध्यावरच सोडलं होतं. दिल्लीच्या वायू प्रदूषणामुळे आपण त्रस्त झालो आहोत, असं कारण नंतर त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर काही दिवसांपूर्वी बाबा रामदेव यांनी घोड्याशी रेस लावली होती. तसा व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केला होता. रामदेव यांनी आपल्या फिटनेसच्या मागे पतंजलिच्या काही उत्पादनाचा हात असल्याचं म्हटलं होतं. त्यावर ब्रायन यांनी हरिद्वारमधील हवा प्रदूषणाचा मुद्दा उचलला. त्यावरून त्यांनी खूप टीकाही केली. आता आणखी एका अजब प्रयोगामुळे ब्रायन चर्चेत आले आहेत.

घोड्याचं इंजेक्शन घेतलं

ब्रायन यांनी घोड्यांना बेशुद्ध करणारं ट्रँक्विलायजर “Ketamine” इंजेक्शन त्यांनी स्वत:ला टोचलं आणि 15 दिवस मेंदूचा डेटा ट्रॅक केला. या इंजेक्शनने माझ्या मेंदूतील सर्व हालचालींना अस्तव्यस्त करून टाकलं आहे, असं ब्रायन यांनी सांगितलं.

त्यांनी याबाबतची ट्विटरवर माहिती दिली आहे. मी “Ketamine” इंजेक्शन घेतलं आणि 15 दिवस ब्रेनचा डेटा ट्रॅक केला. या इंजेक्शनने माझ्या मेंदूला पूर्णपणे स्क्रॅम्बल केलं आहे, असं ब्रायन यांनी म्हटलं आहे. त्यांनी आपल्या मेंदूची तुलना हवाई नेटवर्कशी केली आहे. “Ketamine” घेतल्यावर माझ्या मेंदूतील सर्व हालचाली बदलून गेल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

असा प्रयोग का केला ?

हा प्रयोग का केला याची माहितीही त्यांनी दिली आहे. सामान्यपणे मेंदूच्या हालचाली एका व्यवस्थित पॅटर्नने चालतात. “Ketamine” घेतल्यानंतर हा पॅटर्न तुटला. माझा मेंदू छोट्या आणि कमी उपयोग होणाऱ्या जागांवर अधिक सक्रिय झाला. म्हणजे जसे अमेरिका, यूरोप आणि आशियात छोट्या विमानतळावरील विमाने डायव्हर्ट व्हावी तसे. या इंजेक्शनमुळे ब्रेनच्या ॲक्टिव्हिटीची कठोरता कमी करून तिला अधिक लवचिक केलं जाऊ शकतं. त्यामुळे नव्या विचार आणि शक्यतांचे दरवाजे उघडू शकतात, असं त्यांनी म्हटलं आहे.

यापूर्वीही असे प्रयोग केले

ब्रायन यांनी यापूर्वीही असे अजब प्रयोग केलेत. त्यांनी गेल्या महिन्यात त्यांनी त्यांच्या आणि त्यांच्या लहान मुलांच्या नाइटटाईम इरेक्शनशी संबंधित डेटा सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामुळे मीडियात खळबळ उडाली होती. त्यांनी झोपेची गुणवत्ता, इरेक्शनची संख्या, त्याचा कालावधी आणि इरेक्शनची सरासरी गुणवत्ता आधी डेटा सार्वजनिक केला होता.