AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CPR देऊन वाचवलं चक्क सरड्याला! विचित्र व्हिडीओ व्हायरल…

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. माणसाने माणसाला CPR देतानाचा व्हिडीओ तुम्ही पाहिलाच असेल पण कधी माणसाने एखाद्या सरड्याला CPR दिलेला पाहिलाय का? वाचतानाच विचित्र वाटतंय नाही का? बघताना सुद्धा जरा विचित्रच आहे पण व्हिडीओ बघण्यासारखा आहे आणि खूप व्हायरल होतोय. व्हिडीओ शेवटपर्यंत बघा...

CPR देऊन वाचवलं चक्क सरड्याला! विचित्र व्हिडीओ व्हायरल...
chameleon video viralImage Credit source: Social Media
| Updated on: Oct 12, 2023 | 12:20 PM
Share

मुंबई: सोशल मीडियावर रोज तऱ्हेतऱ्हेचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. डान्स, गाणे, प्रॅन्क, वेगवेगळे पक्षी, प्राणी असे अनेक पद्धतीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. सोशल मीडिया हा लोकांसाठी खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. लोक सुद्धा याचा पुरेपूर फायदा घेताना दिसतात. व्हिडीओ जर हटके असेल तर काहीच वेळात तो व्हायरल होतो. यात प्राण्यांचे व्हिडीओ सुद्धा खूप असतात. अगदी कुत्र्या, मांजरापासून जंगली प्राण्यांपर्यंतचे व्हिडीओ यात असतात. असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय जो व्हिडीओ सरड्याचा आहे. यात एक व्यक्ती एका सरड्याला चक्क CPR देऊन वाचवलंय. आहेना आश्चर्यकारक? बघुयात काय आहे व्हिडीओमध्ये…

मरता-मरता वाचवतोय

CPR देतानाचे अनेक व्हिडीओ तुम्ही आजवर पाहिले असतील. यात सगळ्यात जास्त समावेश असतो तो माणसांना CPR दिल्याचा. कित्येकदा एखाद्याचा जीव जाता-जाता CPR देऊन वाचवला जातो. हे सगळं ठीक पण सरड्याला CPR दिल्याचं पाहिलंय का? होय. एक विचित्र व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात एक माणूस एका सरड्याला मरता-मरता वाचवतोय. व्हिडीओच्या सुरवातीला तो सरडा जमिनीवर बेशुद्ध दिसतो. एक व्यक्ती त्या सरड्याला उचलते तरीही तो सरडा शुद्धीत येत नाही. मग तो माणूस त्या सरड्याला CPR देतो, तोंडाने श्वास द्यायचा प्रयत्न करतो तरीही काही होत नाही. भरपूर प्रयत्नानंतर तो सरडा नीट होतो.

सरड्याला CPR

हा सरडा बेशुद्ध होऊन जमिनीवर पडलेला असतो. एक माणूस तिथे जातो आणि त्याला CPR देतो. तो माणूस त्या सरड्याला उचलून बाटलीत टाकतो आणि त्या सरड्याचा जीव वाचवतो. हा व्हिडीओ विचित्र वाटतो पण बघताना, “माणुसकी अजूनही जिवंत आहे” असं वाटू लागतं. माणसाला CPR देऊन वाचवलं हे तर तुम्ही नेहमीच पाहत असाल पण सरड्याला CPR तुम्ही पहिल्यांदाच बघाल.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.