हा माणूस कावळ्यांशी बोलतो, आवाज देताच कावळे होतात जमा! व्हिडीओ
कल्पना करा की जर एखाद्या व्यक्तीने आकाशातील कावळ्यांच्या कळपाला आवाज देऊन हाक मारली तर? मग ते खूप चकीत करणारे असेल. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे

सहसा पक्षी माणसाला पाहतात तेव्हा त्यांच्यापासून दूर उडतात जेणेकरून त्यांना कोणी ही इजा पोहोचवू नये, पण कल्पना करा की जर एखाद्या व्यक्तीने आकाशातील कावळ्यांच्या कळपाला आवाज देऊन हाक मारली तर? मग ते खूप चकीत करणारे असेल. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे ज्यामध्ये एक व्यक्ती आपल्या आवाजाने आकाशातील सर्व कावळ्यांना हाक मारते. ही प्रतिभा पाहून लोक आश्चर्यचकित होतायत.
खरं तर ही घटना मध्य प्रदेशातील भोपाळची आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या व्यक्तीचं नाव अक्कू भाई असून या व्यक्तीमध्ये एक टॅलेंट आहे. तो काही मिनिटांतच कावळ्यांची गर्दी जमवू शकतो. या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये त्याने कावळ्यांच्या थव्याला एका आवाजात कशी हाक मारली हे दिसत आहे. हे कसं होऊ शकतं यावर लोकांचा विश्वासच बसत नव्हता.
व्हिडिओत दिसत आहे की, ही व्यक्ती कावळ्यांसारखाच आवाज काढते. हा आवाज ऐकताच कावळे हळूहळू येऊ लागतात. मग ते पाहताच कावळ्यांची गर्दी होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भोपाळमधील ही घटना आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती म्हणत आहे की, अक्कू भैय्या कावळ्यांना बोलावून मोकळे आकाश पूर्णपणे भरून टाकेल. बघा…
Crow ? talker pic.twitter.com/roYWKQFr9D
— Dr MJ Augustine Vinod ?? (@mjavinod) February 26, 2023
व्हिडिओच्या पुढच्या भागात हे टॅलेंट पाहून लोक आश्चर्यचकित होतात. अक्कू भैय्या लगेचच कावळ्याचा आवाज काढून कावळ्यांचा ठेवाच बोलावतो. यानंतर संपूर्ण आकाश कावळ्यांनी भरून जाते. त्या माणसाची ही प्रतिभा पाहून लोक आश्चर्यचकित झाले. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी तिथेही आपापल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.
