Viral Video | मांजरीच्या कुरापतीने नेटकरी दंग, व्हिडीओ एकदा पाहाच

एका व्यक्तीने घरात पाळलेल्या मांजरीच्या कुरापती या व्हिडीओमध्ये पाहण्यासारख्या आहेत. (cat eating brinjal video goes viral)

Viral Video | मांजरीच्या कुरापतीने नेटकरी दंग, व्हिडीओ एकदा पाहाच
CAT VIRAL VIDEO

मुंबई : समाजमाध्यमाचं विश्व हे मोठं व्यापक आहे. या माध्यमावर रोज लाखो व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील अनेक व्हिडीओ हे प्राणी तसेच वेगवेगळ्या पक्ष्यांचे असतात. मात्र, यातील काही व्हिडीओ हे लोकांच्या चांगल्याच पसंतीस पडतात. सध्या असाच मांजरीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने घरात पाळलेल्या मांजरीच्या कुरापती या व्हिडीओमध्ये पाहण्यासारख्या आहेत. (video of cat eating brinjal goes viral on social media)

व्हिडीओ व्हायरल का होतोय ?

घरात पाळलेले प्राणी हे मोठे चंचल आणि कुरापतखोर असतात. ते कधी काय करतील याचा नेम नसतो. अनेकवेळा तर ते अशा अनपेक्षित गोष्टी करतात की, ज्यामुळे चांगलीच डोकेदुखी वाढते. या व्हिडीओमध्येसुद्धा असेच काहीसे झाले आहे. व्हिडीओमध्ये दिसतंय त्याप्रमाणे, एका व्यक्तीने घरामध्ये मांजरीला पाळल्याचे दिसतेय. तीच व्यक्ती घरातील फ्रीज उघडताना दसतेय. मात्र, फ्रीजचे दार उघडल्यानंतर अचानकपणे त्याने पाळलेल्या मांजरीने फ्रीजमध्ये उडी घेतली आहे. ही मांजर थेट फ्रीजमध्ये घुसली आहे. बरं ही मांजर फक्त फ्रीजमध्ये गेलेली नाहीये, तर त्यामध्ये ठेवलेल्या सामानावरसुद्धा ही मांजर डल्ला मारताना दिसतेय. तिने फ्रिजधील वांगी आपल्या तोंडाने पकडून फ्रीजच्या बाहेर काढली आहेत.

मांजरीने फ्रीजमध्ये अचानकपणे उडी मारली

या व्हिडीओमध्ये मांजरीने फ्रीजमध्ये अचानकपणे उडी मारली आहे. हा सर्व प्रकार अचानकपणे घडल्यामुळे व्हिडीओतील व्यक्ती गोंधळला आहे. तसेच मांजरीच्या या कुरापतीमुळे हा व्यक्ती चकितसुद्धा झालाय. त्याने मांजरीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. मात्र, ही मांजर त्या व्यक्तीला दाद देत नाहीये. याच गोष्टीमुळे हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, या व्हिडीओला alqemzi_12345 या इन्स्टाग्राम अकाउंटरवर पोस्ट करण्यात आलंय. व्हिडीओ पोस्ट करताच, त्याची सगळीकडे चर्चा होतेय. या व्हिडीओला आतापर्यंत 28 हजार लोकांनी पाहिले आहे. तसेच मांजरप्रेमींनी हा व्हिडीओ पाहून मजेदार कमेंट्स केल्या आहेत.

इतर बातम्या :

Video | रस्त्यावर चालतानाही मोबाईलमध्ये डोकं, नंतर पठ्ठ्यासोबत ‘असं’ घडलं की व्हिडीओ व्हायरल

Video | तरुण सकाळी मासे पकडायला गेला, अचानक समोर आली मगर, नंतर जे घडलं ते पाहाच…

Video | चार अंड्यांची चोरी महागात, पोलीस हवालदार थेट निलंबित, चोरीचा व्हिडीओ व्हायरल

(video of cat eating brinjal goes viral on social media)