Video | तरुण सकाळी मासे पकडायला गेला, अचानक समोर आली मगर, नंतर जे घडलं ते पाहाच…

व्हिडीओमध्ये मासे पकडायला गेलेल्या एका तरुणाचा चक्क मगरीने पाठलाग केलाय. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय. (crocodile chases man while fishing video)

Video | तरुण सकाळी मासे पकडायला गेला, अचानक समोर आली मगर, नंतर जे घडलं ते पाहाच...
CROCODILE VIRAL VIDEO


फ्लोरिडा : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओ हे मजेशीर आणि विनोदी असतात. तर काही व्हिडीओ हे आपल्याला धडकी भरवतात. सध्या आपल्याला घाबरवून टाकणारा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मासे पकडायला गेलेल्या एका तरुणाचा चक्क मगरीने पाठलाग केलाय. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय. (Crocodile chases man while fishing video goes viral)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ अमेरिकेतील फ्लोरिडा येथील आहे. या व्हिडीओमध्ये 22 वर्षीय टॉमी ली हा दक्षिण फ्लोरिडा येथील एवरग्लेड्स येथे एका तलावामध्ये मासे पकडण्यासाठी गेला. यावेळी सुर्योदयाच्या वेळी टॉमी मासे पकडायला गेल्यामुळे या परिसरात कोणीही नव्हते. मासे पकडण्यात दंग असताना टॉमी लीच्या गळाला एक मासा आला. त्यानंतर टॉमीने  त्याच्या जवळीची स्पूल रील गुंडाळायला सुरु केली. रील गुंडाळताना तलावाच्या थोडं दूर गेल्यावर मात्र, माशाऐवजी एक महाकाय मगरच तलावाच्या बाहेर येत असल्याचे या तरुणाला दिसले. हा प्रकार लक्षात येताच सगळं काही सोडून हा तरुण थेट जंगलाकडे पळाळा.

पाहा व्हिडीओ :

मगरीचा पाठलाग, तरुणाने पळ काढला

मात्र, या 22 वर्षीय टॉमीने तलावापासून पळ काढला तरी, ही मगर या तरुणाचा पिच्छा सोडत नव्हती. मगर या तरुणाच्या पाठीमागे लागली होती. ही मगर फक्त तलावापर्यंतच टॉमी लीच्या पाठीमागे लागली असे नाही, तर तिने थेट तलावाच्या बाहेर येऊन थेट जमिनीवर तरुणाचा पाठलाग सुरु केला. या सर्व धांदलीमध्ये हा तरुण एकदा पडलासुद्धा मात्र दैव बलवत्तर म्हणून तो क्रूर मगरीच्या दाढेत सापडला नाही.

दरम्यान 8 मे रोजी ही घटना एवरग्लेड्स येथे घडली. या घटनेची क्लीप सध्या सोशल मीडियावर आल्यामुळे ती चांगलीच व्हायरल होत आहे.

इतर बातमया :

Video | चार अंड्यांची चोरी महागात, पोलीस हवालदार थेट निलंबित, चोरीचा व्हिडीओ व्हायरल

Viral Video | छोट्याशा मुलीची मांजरीच्या पिलासाठी तळमळ, बोबडे बोल ऐकून नेटकरी म्हणतायत “ओ देखो म्याँऊ.. म्याँऊ कर रहे”

Viral Video : त्याने भल्या मोठ्या सापाला उचललं अन् थेट लुंगीत टाकलं; नंतर जे झालं ते एकदा बघाच

(Crocodile chases man while fishing video goes viral)