Video | चार अंड्यांची चोरी महागात, पोलीस हवालदार थेट निलंबित, चोरीचा व्हिडीओ व्हायरल

पोलिसाला अंड्यांच्या हव्यासापोटी नोकरी गमवावी लागली. या पोलीस हवालदाराने अंडी चोरल्यामुळे निलंबित करण्यात आलंय. (punjab police constable stealing eggs)

Video | चार अंड्यांची चोरी महागात, पोलीस हवालदार थेट निलंबित, चोरीचा व्हिडीओ व्हायरल
PANJAB POLICE CONSTABLE

चंदीगड : सरकारी नोकरीसाठी मोठी मेहनत घ्यावी लागते. लाखोंच्या संख्येने प्रतिस्पर्धी असल्यामुळे सरकारी नोकर होणे म्हणजे आजच्या काळात मोठं दिव्य आहे. मात्र, सरकारी नोकरीमध्ये असूनदेखील छोट्याशा चुकांमुळे नोकरी गमवावी लागली तर ? असंच काहीसं पंजाबमध्ये एका पोलिसासोबत झालं आहे. या पोलीस हवालदाराला अंड्यांच्या हव्यासापोटी नोकरी गमवावी लागलीये. अंडी चोरल्यामुळे या हवालदाराला निलंबित करण्यात आलंय. पोलीस हवालदाराच्या चोरीचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. (Punjab police constable stealing eggs from roadside bike video goes viral)

नेमका प्रकार काय ?

पंजाबमध्ये एक हवालदार कर्तव्यावर होता. त्याच्याकडे रस्यावरील रहदारी सांभाळण्याचे काम होते. यावेळी रस्त्यावर छिंदर नावाचा एक अंडी विक्रेता त्याची दुचाकी घेऊन थांबला. बाजूच्या एका दुकानात अंड्यांची ऑर्डर देण्यासाठी तो आपली दुचाकी सोडून गेला. त्याच्या दुचाकीवर शेकडो अंडे ठेवण्यात आले होते. यावेळी या अंडेविक्रेत्याने अंड्यांच्या सुरक्षेसाठी कोणतीही खबरदारी घेतली नव्हती. अंड्यांच्या ट्रेमध्ये हात टाकला की ते सहज काढून घेता येत होते. हीच गोष्टा समोर असलेल्या पोलीस हवालदाराने हेरली. त्यानंतर त्याने थेट अंड्यांवर डल्ला मारायचा बेत आखला. त्याने रस्त्यावरील रहदारी सांभाळण्याचे नाटक करत बाजूला उभ्या असलेल्या दुचाकीवरुन अंडी चोरली. पोलीस हवालदाराने एकानंतर एक असे चार अंडे आपल्या खिशात टाकले. त्यानंतर अंडीविक्रेता वापस आपल्या दुचाकीजवळ आल्यामुळे हवालदाराने तेथून पळ काढला.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

ट्रेमधून अंडी चोरतानाचा हा प्रकार बाजूला उभा असलेल्या एका माणसाने मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. सर्वांची रक्षा करणारे पोलीसच शेवटी अशा प्रकारे भक्ष्यक झाल्यामुळे हा व्हिडीओ अत्यंत कमी काळात व्हायरल झाला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे हा प्रकार SSP अमनित कौंडल यांना समजला. त्यानंतर पोलीस हवालदाराची करामत पाहून कौंडल यांनी त्याला थेट निलंबित केले. तसेच निलंबितच नाही तर या प्रकाराची विभागीय चौकशी करण्याचे आदेशसुद्धा कौंडल यांनी दिले.

नोकरी गमवावी लागली

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. प्रत्येक अंडे पाच रुपये या प्रमाणे पकडले तर फक्त वीस रुपयांसाठी या पोलीस हवालदाराला आपली मोलाची नोकरी गमवावी लागली. तसेच, पोलीस खात्यातसुद्धा या हवालदाराला सर्वांसमोर टीकेचा धनी व्हावं लागलं. अंड्यांच्या हव्यासामुळे या हवलदाराला लाखमोलाची नोकरी गमवावी लागली. हा व्हिडीओ पंजाबचा असला तरी तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

इतर बातम्या :

तब्बल 7 हजार हापूस आंब्यांचे दान, पाहा विठ्ठल रुक्मिणी मंदिराची डोळ्याचं पारणं फेडणारी सजावट

Viral Video | छोट्याशा मुलीची मांजरीच्या पिलासाठी तळमळ, बोबडे बोल ऐकून नेटकरी म्हणतायत “ओ देखो म्याँऊ.. म्याँऊ कर रहे”

Viral Video : माणसांना लाजवेल असा कुत्र्याचा व्यायाम, अनेकांनी घेतली प्रेरणा, व्हिडीओ व्हायरल

(Punjab police constable stealing eggs from roadside bike video goes viral)