AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आईचा जबरदस्त जुगाड, शाळेत जाताना मोजे हरवले, मग जे केले त्याचा व्हिडिओ पाहून त्या मातेचे कराल कौतूक

Viral Video: भारतीय आई सर्वाधिक जास्त जुगाड करणारी आहे. दुसरा म्हणतो, भारतीय आईला तोड नाही. एकाने तर म्हटले की, त्या मातेला ऑस्कर दिले गेले पाहिजे. हा जुगाडचा शोध आईने लावला मम्मीने नाही, असे म्हणत भारतीय मातेचे कौतूक आणखी एका नेटकऱ्याने केले आहे.

आईचा जबरदस्त जुगाड, शाळेत जाताना मोजे हरवले, मग जे केले त्याचा व्हिडिओ पाहून त्या मातेचे कराल कौतूक
व्हायरल व्हिडिओ
| Updated on: Dec 30, 2024 | 5:54 PM
Share

Viral Video: सध्या ऑनालाईनचा जमाना आहे. कोणतीही गोष्ट काही मिनिटांत घरपोहच मिळते. परंतु काही काळापूर्वी महिन्याभराची खरेदी एकाच वेळी होत होती. त्या दरम्यान एखाद्या गोष्टीची कमतरता जाणवली की जुगाड केला जात होता. आता शाळेत जाताना मुलाचे मोजे मिळाले नाही. मग त्या आईने जुगाड केला. अनोखा फंडा वापरला. त्यामुळे मुलाने मोजेच घातल्याचे दिसू लागले. त्या मातेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

असा केला जुगाड

मुलाच्या शाळेत काळे बूट आणि काळे मोजे लागतात. मग मुलगा शाळेत निघाला असताना मोजे मिळाले नाही. त्या मुलाच्या आईने मोज्याला पर्याय शोधला. मुलाने काळे मोजे घातले आहे हे दाखवण्यासाठी त्याची आईने त्याच्या पायावर तव्यातील काजळी लावली. त्यामुळे मुलाने मोजेच घातले आहे, हे दिसू लागले. ती काजळी लावल्यावर मुलगा पायात फक्त शूज घालतो आणि त्याच्या शाळेसाठी निघतो. मुलाची सर्वात मोठी अडचण आईने सोडवल्याचे सामाधान त्या मातेच्या चेहऱ्यावर दिसते.

नेटकऱ्यांनी केले कौतूक

मुलाच्या पायाला लावलेली काजळी अगदी मोजे घातल्यासारखी दिसते. त्या आईच्या या कल्पकतेचे कौतूक नेटकऱ्यांनी केले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया साईट एक्स पर @_salony05 नावाच्या युजरने अपलोड केला आहे. लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. अनेकांनी लाईक आणि शेअर केला आहे.

व्हिडिओवर लोकांनी कमेंट करताना त्या आईच्या बुद्धिमत्तेचे जबरदस्त कौतूक केले आहे. एका युजरने म्हटले की, भारतीय आई सर्वाधिक जास्त जुगाड करणारी आहे. दुसरा म्हणतो, भारतीय आईला तोड नाही. एकाने तर म्हटले की, त्या मातेला ऑस्कर दिले गेले पाहिजे. हा जुगाडचा शोध आईने लावला मम्मीने नाही, असे म्हणत भारतीय मातेचे कौतूक आणखी एका नेटकऱ्याने केले आहे. भारतीय महिलांकडे प्रत्येक गोष्टीवर तोडगा असल्याचे म्हटले आहे.

टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री.
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का.
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?.
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?.
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.