AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कमला हॅरिस यांच्या निवडणूक प्रचारात ‘नाचो नाचो’ चा तडका, मजेशीर व्हिडियो व्हायरल

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीची रंगत दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. भारतीय मूळ असलेल्या कमला हॅरिस निवडून येणार की डोनाल्ड ट्रम्प यांना दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदाची संधी मिळणार याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

कमला हॅरिस यांच्या निवडणूक प्रचारात 'नाचो नाचो' चा तडका, मजेशीर व्हिडियो व्हायरल
| Updated on: Sep 10, 2024 | 4:15 PM
Share

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकांची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसे हा निवडणूक प्रचार इंटरेस्टींग होत चालला आहे. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्या निवडणूक प्रसिद्धी दल नवनवीन क्रीएटीव्ह कॅंपेनच्या पद्धती वापरीत आहेत. रोज नवनवीन व्हिडीओ समोर येत आहेत. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीत उतरल्यानंतर अमरिकेतील भारतीयांना आकृष्ट करण्यासाठी नवनवीन क्लृप्त्या वापरल्या जात आहेत. भारतीय आणि अमेरिकन नेते अजय भुटोरिया यांनी हॅरिस यांच्यासाठी खास कॅंपेन सॉंग तयार केले आहे. यात नाचो-नाचो हे आरआरआर याचित्रपटातील गाण्याचा वापर केला आहे.

1.5 मिनिटांच्या या व्हिडीओत कमला हॅरिस यांच्या निवडणूक प्रचाराची झलक दिसते. यात ‘हमारी ये कमला हॅरिस’ अशा देखील ओळी देखील आहेत. या व्हिडीओद्वारे अमेरिकेत राहणार्‍या भारतीय समुदाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हॅरिस फॉर प्रेसिडेंटच्या नॅशनल कमिटीचे सदस्य असलेल्या अजय भुटोरिया यांनी हा ‘आरआरआर’ चित्रपटातील ऑस्कर पुरस्कार विजेत्या गाण्याचा कल्पक वापर हॅरिस यांच्यासाठी केला आहे. या गाण्याचा हॅरिस यांच्या प्रचारासाठी वापर करून अमेरिकेत राहणार्‍या 50 लाख साऊथ एशियन मतदारांना आकर्षित करण्याची भुटोरिया यांची खेळी आहे. मिशिगन, पेंसिल्वेनिया, विस्कॉन्सिन, जॉर्जिया, नेवाडा आणि एरिझोना या अमेरिकन राज्यातील जनतेला आकर्षित करण्यासाठी या व्हिडीओचा प्रसार केला जात आहे.

येथे पाहा मजेशीर व्हिडीओ –

साऊथ एशियन कम्युनिटीचा पाठिंबा मिळविण्याच प्रयत्न

कमला हॅरिस या मूळच्या दक्षिण भारतीय असल्याने तसेच बॉलीवूडच्या गाण्यांचा अमेरिकेतली भारतीयांवर असलेला पगडा पाहाता. ही निवडणूक प्रचार मोहीम आता भावनिक पातळीवर उतरली आहे. तसेच या निवडणूकीत कमला हॅरिस यांनी आपल्या भारतीयत्वाचा वापर येथील मतदारांना आकर्षित करण्यासाठी केला आहे.आता साल 2024 च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीसाठी नाचो नाचो या गाण्याची जादू किती उपयोगी येते हे कळण्यासाठी नोव्हेंबर महिन्याची वाट पाहावी लागणार आहे.

कधी आहे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक

अमेरिकेत या वर्षी 5 नोव्हेंबर रोजी राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. या निवडूकीसाठी 16 कोटी नोंदणीकृत मतदार आहे. हे मतदार 60 व्या राष्ट्राध्यक्षाची निवड करणार आहेत.जगातील सुपरपॉवर म्हटल्या जाणाऱ्या या देशाच्या सर्वोच्च पदावर आता डोनाल्ड ट्रम्प येतात की कमला हॅरिस याकडे जगभरातील लोकांच्या नजरा लागल्या आहेत.

अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार.
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.