टॉवेल गुंडाळून किचनमध्ये आली महिला, तेव्हा घडला खतरनाक अपघात, लोकांनी शोधून काढली गडबड !
सोशल मीडियावर एक खूपच शॉकिंग व्हिडीओ शेअर झालेला आहे. एक महिला आपल्या किचनमध्ये अशी चूक करते ज्यामुळे तिचे प्राणही जाऊ शकले असते. परंतू चाणाक्ष लोकांनी सत्य शोधून काढले.

सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. येथे एक सेकंदाचा व्हिडीओ लाखो लोकांच्या जीवनाला प्रभावित करु शकतो. अलिकडेच इंस्टाग्रामवर असाच एक शॉकींग व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओ किचनमधील सेफ्टीवरुन चर्चा सुरु झाली. व्हिडीओत एक महिला टॉवेल गुंडाळून किचनमध्ये घुसताना दिसते.ती गॅसवर ठेवलेला गरम प्रेशर कुकर सुरक्षेविना थेट खाली उतरवून नळाच्या खाली ठेवते.तेव्हा अचानक मोठा स्फोट होतो आणि कुकरचे झाकण उडते. पुढे काय होते…
महिलेने गरम कुकर अचानक गॅसवरुन काढून नळाच्या वाहत्या पाण्यात ठेवल्याने कुकरचा स्फोट होतो. कुकरमधील डाळ आणि तांदूळ जे काही ठेवले तर इतरत्र उडते. महिला किंचाळत मागे हटते. आणि व्हिडीओ कॅप्शन असते की : किचनमध्ये अशी चूक कधी करु नका , जीव जाऊ शकतो ! या व्हिडीओने ४८ तासात ५ दशलक्ष व्यूज मिळवले आणि २ लाख शेयर्स मिळवले. परंतू या व्हिडीओतील ट्वीस्ट कोणाला कळलेले नाही.
लोक घाबरले, पण….
व्हिडीओची सुरुवात सामान्य सीनने होते. महिला शॉवर घेतल्यानंतर टॉवेल लपेटून किचनमध्ये जाते. जेवण शिजले की नाही हे चेक करण्यासाठी ती कूकर गॅसवरुन उतरवते. परंतू कोणत्याही चिमट्या शिवाय ती थेट हाताने कूकर पकडते. नळ खोलून कूकर थंड करताना कुकरचा ब्लास्ट होतो. युजर्सने या व्हिडीओला कमेंट देताना, ही तर सुसायडल मुव्ह आहे, दहा मिनिटे आधी कूकर थंड करायला हवा होता, असे लिहीले आहे. परंतू फॅक्ट चेकर्स नजर पडताच सर्व राज उघड होते.
स्नोप्स आणि फॅक्टली सारख्या प्लॅटफॉर्म्सने या व्हिडीओचा एनालिसिस केला. व्हिडीओतील सावल्या चुकीच्या आहेत. तसेच स्फोटाचा साऊंड ओव्हरलॅप्ड वाटतो. आणि महत्वाचे म्हणजे महिलेच्या हालचालीत AI ची क्लासिक गडबड नजरेस येते. फिंगर्स फ्युज्ड आहेत. बॅकग्राऊंड ब्लर अननॅचरल आहे. असली क्लिपमध्ये महिलेने कुकरला सुरक्षित पद्धतीने उतरला होता. हाताने पकडले पण कूकर जास्त गरम नव्हता. AI टुल्स सारख्या मिडजर्नी वा स्टेबल डिफ्युजनने यास एडीट करुन खतरनाक बनवले.
येथे पाहा व्हिडीओ –
View this post on Instagram
एआय हातातून निसटतोय
हा व्हिडीओ जर शेअर झाला तसा व्हायरल झाला. आधी तर लोक घाबरले की असाही अपघात होऊ शकतो. परंतू जेव्हा सत्यता समजली तेव्हा लोकांनी एआयवर टीका करणे सुरु केले. भारतात देखील व्हॉट्सग्रुपवर हा व्हिडीओ खूप शेअर झाला.यावर प्रतिक्रीया देताना महिलांनी आता कूकर वापरणार नाही असे म्हटले ! तज्ज्ञांनी सांगितले की वास्तवात कुकरचा स्फोट होणे दुर्लभ प्रकार आहे. परंतू चुकीच्या वापराने धोका होऊ शकतो. इंडियन गॅस अथोरिटीनुसार जर वर्षी ५०० हून अधिक किचन अपघात कुकरने होतात. बहुतांशी अपघात ओव्हर प्रेशर किंवा चुकीच्या क्लीनिंगने होतात. परंतू हा व्हिडीओ एडीटेड आहे. अशा कोणताही अपघात झालेला नाही.
