AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लावणीच्या नावाखाली नंगानाच, थेट स्टेजवरच… नर्तकीचा तो व्हिडीओ शेअर करुन लावणी कलाकारांचा संताप

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये नृत्यांगनाने भर स्टेजवर जे कृत्य केले ते पाहून लावणी कलाकार संतापले आहेत. एका लावणी कलाकाराने या नृत्यांगनेचा व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

लावणीच्या नावाखाली नंगानाच, थेट स्टेजवरच... नर्तकीचा तो व्हिडीओ शेअर करुन लावणी कलाकारांचा संताप
लावणी कलाकारImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 13, 2026 | 6:03 PM
Share

लावणी नृत्य हे महाराष्ट्राची लोककला म्हणून ओळखले जाते. गावा-खेड्यात जत्रेत मनोरंजन करण्यासाठी पिढ्या न पिढ्या लावणी सादर केली जाते. ही लोककला पाहण्यासाठी गावाच्या जत्रेत तुफान गर्दी देखील झाल्याचे पाहायला मिळते. पण लावणी सादर करणे हे सोपे नसते. लावणी करण्यासाठी नचत्याची जाण लागते त्याचबरोबर नृत्य सादर करण्याची कला, अदाही गरजेच्या असतात. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लावणी सादर करणाऱ्या नृत्यांगनाने असे काही केले आहे जे पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

काय आहे प्रकरण?

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक नृत्यांगना लावणी सादर करताना दिसत आहे. तिने निळ्या रंगाचा डीपनेक ब्लाऊज परिधान केला आहे. त्यावर आंबा कलरची नऊवारी साडी नेसली आहे. मोकळे केस, शोभेल असा मेकअपमध्ये नृत्यांगना सुंदर दिसत आहे. मात्र, तिने नृत्य सादर करताना जे काही अश्लील कृत्य केले आहे ते पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

काय आहे व्हिडीओ?

सोशल मीडियावर कलाकार सुशांत सावंतने या नृत्यांगनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सुरुवातीला नृत्यांगनाने जे काही अश्लील कृत्य केले आहे ते दाखवण्यात आले आहे. त्यानंतर त्याने स्वत:ची एक क्लिप व्हिडीओमध्ये वापरली आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला, एकीकडे लावणीच्या नावावर नंगानाच करायचा, ह्याला काही मर्यादा नाही असे लिहिले आहे. पुढे त्याने स्वत:लावणी सादर करतानाची क्लिप वापरली आहे. त्यावर आणि इथे माझ्यासारखे अनेक आहेत जे खरी लावणी जीवापाड जपत आहेत असे लिहिले आहे.

नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया

या कलाकाराने हा व्हिडीओ शेअर करत, शेवट पर्यंत नक्की बघा. प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. आपण नेहमी गप्प राहतो आणि ह्यांना हे करायला रान मोकळ मिळत. अश्या नंगानाच करण्याऱ्या प्रयकीला boycott करायला हवं असं कॅप्शन दिले आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत संताप व्यक्त केला आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा