Viral Post: चोरी करत होते, डास चावले म्हणून डासांना मारलं…पोलीस वाढीव, डासांची DNA टेस्ट केली!

Viral: पण ज्याचं रक्त शोषलं जातंय तो चोर असू शकतो, तो चोर गेल्यावर मच्छर मरू शकतो आणि मग त्या मेलेल्या मच्छरच्या रक्तावरून चोर सापडू शकतो असा एकदम युनिक विचार केलाय का तुम्ही? अहो असं काय करताय, मच्छर चोराला चावला ना?

Viral Post: चोरी करत होते, डास चावले म्हणून डासांना मारलं...पोलीस वाढीव, डासांची DNA टेस्ट केली!
Viral Post
Image Credit source: Social Media
रचना भोंडवे

|

Jul 20, 2022 | 9:06 AM

फुझियान : पोलिसांनी चोराला पकडलं हे काय नवीन नाही. पण ते त्याला कशा पद्धतीने पकडतात तो मात्र चर्चेचा विषय असतो. चीनमधली एक घटना खूप व्हायरल (Viral) झालीये. ज्यात चोर चोरी करतात आणि ते कुठलाच मागे ठेवत नाहीत, मग पोलीस शक्कल लढवतात आणि मग हे सगळं व्हायरल होतं. काय झाला असेल? आपण हे शिकलोय की मच्छर चावले की ते आपलं रक्त शोषून घेतात. पण ज्याचं रक्त शोषलं जातंय तो चोर असू शकतो, तो चोर गेल्यावर मच्छर मरू शकतो आणि मग त्या मेलेल्या मच्छरच्या रक्तावरून चोर सापडू शकतो असा एकदम युनिक विचार केलाय का तुम्ही? अहो असं काय करताय, मच्छर चोराला चावला ना? मग मच्छरचं जर रक्त तपासलं (Blood Test) तर ते रक्त कुणाचं? विज्ञान आहे. पोलिसांनी (Police) लावलं तितकं डोकं झाला मग किस्सा व्हायरल.

मेलेल्या डासामुळे पकडले

चीनमध्ये पोलिसांनी चोराला 19 दिवसांनी तेही चक्क मेलेल्या डासामुळे पकडले. घरफोडी झालेल्या घरात दोन मृत डास सापडले, भिंतीवरील रक्ताचे डाग वापरून डीएनएद्वारे पोलिसांनी चोराला शोधून काढले. पोलिसांनी पुराव्यासाठी घराची कसून तपासणी केली तेव्हा त्यांना घराच्या लिव्हिंग रुमच्या भिंतीवर दोन मृत डास व रक्ताचे डाग आढळून आले. डासांच्या रक्ताचे थेंबही बाहेर आले होते. पोलिसांनी ते रक्ताचे नमुने घेऊन डीएनए चाचणीसाठी पाठवले.

घरातच एक रात्र काढली

रिपोर्टनुसार, 1 जून रोजी फुझियान प्रांतातील फुझोऊ येथे घरफोडीची घटना घडली होती. चोरट्याने तेथून लाखो किमतीच्या अनेक मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला. पोलीस आल्यावर घराचा दरवाजा आतून बंद असल्याने चोर बाल्कनीतूनच घरात घुसल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. चोराने त्याच घरात एक रात्र घालवल्याचा अंदाजही पोलिसानी व्यक्त केला; कारण स्वयंपाक घरात उरलेले नूडल्स आणि अंड्यांचे कवच आढळले. तसेच, घराच्या मालकाच्या बेडरूममध्ये ब्लॅकेटचा वापर केल्याचेही लक्षात आले.

डासच पोलिसासाठी उपयुक्त ठरले

डीएनए चाई नावाच्या एका गुन्हेगाराशी जुळले, लगेच पोलिसांनी चाईला 30 जून रोजी ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीनंतर चाईने अपार्टमेंटमधील घरफोडीसोबतच इतर चार चोरीचीही कबुली दिली. पोलिसांनी सांगितले की, दोन्ही डासांनी चोराचा चावा घेतला आणि त्याचे रक्त प्यायले, त्यानंतर चोरट्याने त्यांना ठार केले, अशात ते डासच पोलिसासाठी उपयुक्त ठरले आणि 19 दिवसानी आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले, सोशल मीडियात सध्या ही घटना चर्चेत आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें