VIDEO : कुत्र्याची अनोखी शक्कल ! चिमुकलीला नदीत बुडण्यापासून वाचवलं, उगाच इमानदार नाही म्हणत

कुत्र्याने लहाण मुलीचा जीव वाचवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होतोय (viral video of dog save little girl life from falling into deep water).

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:01 PM, 22 Feb 2021
VIDEO : कुत्र्याची अनोखी शक्कल ! चिमुकलीला नदीत बुडण्यापासून वाचवलं, उगाच इमानदार नाही म्हणत

मुंबई : प्राण्यांना जीव लावला तर ते आपल्यासाठी एकवेळ जीवही देतील, असं म्हणतात. अगदी त्याचाच प्रत्यय एका ठिकाणी आला आहे. एक चिमुकली खेळता-खेळता नदीजवळ गेली. तिचा चेंडू नदीपात्रात गेला. तो चेंडू घेण्यासाठी ती नदीपात्रात उतरण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात तिथे असलेला एक कुत्रा मुलीला मागे खेचतो. कुत्रा तिथे आला नसता तर कदाचित ती मुली नदी पात्रात पडली असती आणि अनर्थ घडलं असतं. मात्र, कुत्र्याने मुलीचा जीव वाचवला. याबाबातचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे? ते अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, सोशल मीडियावर कुत्र्याचं प्रचंड कौतुक होत आहे (viral video of dog save little girl life from falling into deep water).

कुत्रा आणि माणसाचं एक वेगळं भावनिक नातं असतं. हे नातं आताच नाही तर गेल्या कित्येक शतकांपासूनचं आहे. अनेक लोक घरी कुत्रा पाळतात. कुत्र्याला माणसाचा एक खरा आणि इमानदार दोस्त मानलं जातं. कुत्रा घरात राहून किंवा घराच्या ओसरीत राहून घराचं राखण करतो. तो अनेक जबाबदाऱ्या कोणत्याही तक्रारींशिवाय पार पाडतो. त्यामुळे कुत्रा आणि माणूस यांच्यात अतिशय जिव्हाळ्याचं नातं असतं.

कुत्र्याने लहाण मुलीचा जीव वाचवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओत कुत्रा मुलीला मागे खेचतो. त्यानंतर मुलगी रडू नये म्हणून तो स्वत: नदीपात्रात जातो आणि तिथून चेंडू घेऊन येतो. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार तिथे उपस्थित असलेल्या कुणीतरी कॅमेऱ्यात कैद केला आहे.

या व्हिडीओल सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेकांकडून हा व्हिडीओ शेअर केला जातोय. तसेच शेकडो लोकांनी आतापर्यंत हा व्हिडीओ बघितला आहे. त्याचबरोबर अनेकांनी या व्हिडीओला लाईकही केलं आहे. व्हिडीओ पाहून अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे (viral video of dog save little girl life from falling into deep water).

हेही वाचा : तुम्हाला पुजा शर्माचा व्हिडीओ कॉल तर नाही येत? सावधान, मुंबईत सेक्सटॉर्शनचा पर्दाफाश!