Viral Video : चक्क गेंड्याचं चुंबन घेतेय ‘ही’ तरुणी; यूझर्स म्हणतायत, जंगली प्राण्यांपासून दूर राहा, भडकला तर…

एका मुलीचा आणि गेंड्या(Rhinoceros)चा एक व्हिडिओ (Video) समोर आला आहे, जो लोकांना खूप आश्चर्यचकित करत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मुलगी गेंड्याला मिठी मारत आहेत एवढंच नाही तर चुंबन (Kiss) घेतानाही दिसत आहे. 21 सेकंदाच्या या व्हिडिओनं खळबळ उडवली आहे.

Viral Video : चक्क गेंड्याचं चुंबन घेतेय 'ही' तरुणी; यूझर्स म्हणतायत, जंगली प्राण्यांपासून दूर राहा, भडकला तर...
गेंड्याचं चुंबन घेताना तरुणी
Follow us
| Updated on: Feb 04, 2022 | 3:19 PM

Rhinoceros and girl video : हत्तीनंतर जर कोणाला सर्वात शक्तिशाली प्राणी मानलं जात असेल तर तो गेंडा आहे. कधी कधी ते हत्तीशीही भिडतात. गेंडा त्यांच्या टोकदार शिंगांनी कोणालाही काही सेकंदात धूळ चारू शकतो. यामुळेच ‘जंगलाचा राजा’ सिंहही गेंड्याशी पंगा घेण्यापूर्वी दोनदा विचार करतो. अशावेळी माणसाची तर गोष्ट दूरच. यातल्या कोणत्याही प्राण्याच्या जवळ जाताना माणूस 100वेळा विचार करतो. पण आजकाल एका मुलीचा आणि गेंड्या(Rhinoceros)चा एक व्हिडिओ (Video) समोर आला आहे, जो लोकांना खूप आश्चर्यचकित करत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मुलगी गेंड्याला मिठी मारत आहेत एवढंच नाही तर चुंबन (Kiss) घेतानाही दिसत आहे. 21 सेकंदाच्या या व्हिडिओनं सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.

कमकुवत हृदयाचे लोक पाहू शकत नाहीत!

सोशल मीडियात वन्य प्राण्यांशी संबंधित काही व्हिडिओ रोज व्हायरल होत असतात. यातील काही एवढ्या मजेशीर असतात की त्या पुन्हा पुन्हा पाहत राहावं वाटतं. तर काही आश्चर्यचकित करणारे असतात. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहा. व्हिडिओमध्ये एक मुलगी एका महाकाय गेंड्याच्या मिठीत आहे आणि कापसापासून बनवलेल्या खेळण्यासारखं चुंबन घेत आहे. या दरम्यान तुम्ही बघू शकता, की गेंडासुद्धा तिच्यावर हल्ला करत नाही. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कमकुवत लोकांच्या हृदयाचे ठोके वाढू शकतात.

इन्स्टाग्रामवर शेअर

मुलगी आणि गेंड्याचा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर rhinohuose नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. 15 जानेवारीला इन्स्टाग्रामवर अपलोड केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 80 हजार व्ह्यूज आले आहेत. त्याच वेळी, व्हिडिओ पाहिल्यानंतर, यूझर्स त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

‘जंगली प्राण्यांपासून दूर राहणं चांगलं’

एका यूजरने कमेंट करत लिहिलं, की ही मुलगी वेडी आहे. जर गेंडा भडकला तर तिची संध्याकाळ नक्की येणार आहे. त्याचवेळी आणखी एका यूझरनं आश्चर्यानं कमेंट केली, की आतापर्यंत हा गेंडा शांत पाहून मला खूप आश्चर्य वाटत आहे. कारण ते काही मिनिटांत कुणाचाही जीव घेऊ शकतात.’ दुसऱ्या यूझरनं कमेंट करत लिहिलं, की अशा जंगली प्राण्यांपासून दूर राहणं चांगलं. ते कोणाचे मित्र होऊ शकत नाहीत.

View this post on Instagram

A post shared by rhinohuose (@rhinohuose)

Viral Video : फटाक्यांच्या आवाजाचा कुत्र्याला होत होता त्रास; मग या गोड चिमुरडीनं असं काहीतरी केलं, की…

Viral : पोलिसांना फायर नाही तर फूल समजलं आणि..; रक्तचंदन तस्कराच्या रिअल लाइफमध्ये काय घडलं? वाचा

तंत्रज्ञानाचा ‘असा’ही आविष्कार, लंडनमधली Wheelchair Lift पाहिली का? Video होतोय Viral

Non Stop LIVE Update
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक.
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा.
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने.
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात.
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.