Video : दोन वैमानिकांनी विमानांची अदलाबदल करण्याचा प्रयत्न केला, पण घडलं भलतंच! पाहा व्हीडिओ…

हा व्हीडिओ अरोन टेविस या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला आतापर्यंत दोन लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. तर हजारोंनी याला लाईक केलं आहे.

Video : दोन वैमानिकांनी विमानांची अदलाबदल करण्याचा प्रयत्न केला, पण घडलं भलतंच! पाहा व्हीडिओ...
व्हायरल व्हीडिओ
आयेशा सय्यद

|

Apr 26, 2022 | 7:56 PM

मुंबई : सध्या सोशल मीडियावर काही व्हीडिओ व्हायरल (Viral Video) होत आहेत. यात काही अंगावर काटा आणणारे व्हीडिओ पाहायला मिळतात. असाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोन विमानं आकाशात उडताना पाहायला मिळत आहेत.यात चक्क विमानाचे पायलट बदलल्याचं पाहायला मिळतं. यात दोन स्कायडायव्हर्सने अजब प्रयोग केला. दोघांनीही आपापल्या विमानातून हवेत उडी मारली आणि एकमेकांच्या विमानात चढण्यासाठी उडी घेतली. हवेत उडणाऱ्या विमानाची (Aircraft) अदलाबदल करण्याच्या प्रयत्नात असतानाच विमान कोसळलं.

नेमकं काय घडलं?

दोन विमानं आकाशात उडताना पाहायला मिळत आहेत.यात चक्क विमानाचे पायलट बदलल्याचं पाहायला मिळतं. यात दोन स्कायडायव्हर्सने अजब प्रयोग केला. दोघांनीही आपापल्या विमानातून हवेत उडी मारली आणि एकमेकांच्या विमानात चढण्यासाठी उडी घेतली. हवेत उडणाऱ्या विमानाची अदलाबदल करण्याच्या प्रयत्नात असतानाच विमान कोसळलं.

हा व्हीडिओ अरोन टेविस या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला आतापर्यंत दोन लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. तर हजारोंनी याला लाईक केलं आहे.

याआधीही असाच अंगावर काटा आणणारा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यात एक गाडी रस्त्यावरून जाताना दिसत आहे. त्याच्या टपावर एक माणूस बसलेला दिसत आहे. गाडी एका पुलावरून जाताना दिसते. इतक्यात अनपेक्षित काही घडतं. टपावर बसलेला हा माणूस अचानकपणे चालत्या गाडीवरून बिंधास्तपणे उडी मारतो. खाली खोल दरी दिसतेय.उडी मारल्यावर त्याचं पॅराशूट ओपन होतं. आणि तो हवेत तरंगायला लागतो. त्याचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें