VIRAL VIDEO : कपडे घालून, अंग झाकून बसले, प्रॉब्लेम काय ? ताजमध्ये मांडी घालून बसली, हटकल्याने वाद, व्हिडीओ चर्चेत
Viral Video : दिवाळीच्या निमित्ताने एक महिला तिच्या बहिणीसह डिनरसाठी ताज हॉटेलमध्ये पोहोचली. मात्र तिथे तिच्यासोबत जे घडलं त्याने ती दुखावली गेली आणि हॉटेलमधूनच एक व्हिडीओ शेअर करत तिने निराशा व्यक्त केली. बघता बघता हाँ व्हिडीओ व्हायरल झाला असून सध्या सगळीकडे त्याचीच चर्चा सुरू आहे. असं नेमकं काय घडलं त्या महिलेसोबत ?

Viral Video : सणानिमित्त गोडधोड खाल्ल जातं, आपल्या माणसांसोबत येऊन गप्पा मरात, मजा करत सण साजरे केले जातात. दिवाळीनिमित्ता आपल्यापैकी बहुतांश लोकांनी ही मजा केली असेल. सेलिब्रेशनची प्रत्येकाची वेगळी पद्धत असते. कधी कोणी घरीच मजा करतात तर काही जण बाहेर जेवायला जायचा प्लान आखतात. अशीच एक महिला दिवाळीनिमित्त तिच्या बहिणीसोबत डिनरसाठी सुप्रिसद्ध ‘ताज’ हॉटेलमध्ये गेली. एक अनोखा अनुभव म्हणून त्यांनी हे हॉटेल निवडलं, पण तिथे गेल्यावर त्यांच्यासोबत जे घ़डलं, त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय.
यासंदर्भात त्या महिलेने स्वत:च ताज हॉटेलमधून एक व्हिडीओ रेकॉर्ड करत तो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे, जो सध्या वाऱ्याच्या वेगाने पसरलाय. त्या व्हिडीओमध्ये संबंधित महिलेने जे घडलं ते सांगत तिची निराशा व्यक्त केली आहे. एक सामान्य माणूस हाँ दिवस-रात्र मेहनत करून पैसे कमावतो. कुटुंबियांसोबत एखाद्या चांगल्या ठिकाणी जाऊन जेवता येईल, अशी अपेक्षा असते. पण तिथे जाऊन त्यांना नीट वागणूक मिळाली नाही तर मन दु:खी होतं, असं तिने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
ताज हॉटेलमध्ये मॅनेजरने शिकवले ‘मॅनर्स’
या व्हिडीओत बोलणार महिला खूप चिडलेली, निराश दिसत होती. तिच्या सांगण्यानुसार, दिवाळीनिमित्त ती तिच्या बहिणीसोबत ताज हॉटेलमध्ये जेवायला गेली. मात्र ती तिथे जेवत असतानाच अचानक तिथला मॅनेजर तिच्याजवळ आला आणि त्याने तिला टोकलं. हॉटेलमध्ये आलेल्या एका गेस्टला (त्या महिलेची) तिची बसण्याची पद्धत योग्य वाटत नसल्याचे मॅनेजरने तिला सांगितलं. त्यानंतर महिलेने दाखवल की ती तेथील खुर्चीवर पायांची मांडी घालून बसली आहे, पण ते ताजच्या एका कस्टमरला आवडलं नाही आणि त्याने मॅनेजरकडे या गोष्टीची तक्रार केली.
नंतर मॅनेजरने त्या महिलेला सांगितले की हे एक फाईन डायनिंग आहे, जिथे अनेक श्रीमंत लोक जेवणासाठी येतात, म्हणूनच तिने व्यवस्थित आणि पाय खाली ठेवून बसावे, असा सल्ला दिला. त्यानंतर त्या महिलेने असाही दावा केला की, ती कोल्हापुरी चप्पल घालून आली होती, परंतु मॅनेजरने तिला बंद बूट घालण्यास सांगितले.
एक आम इंसान, जो मेहनत करके, अपना पैसा कमा कर, अपनी इज़्ज़त के साथ ताज होटल में आता है — उसे आज भी इस देश में ज़लील और अपमानित होना पड़ता है। और मेरी गलती क्या है? सिर्फ़ ये कि मैं बैठ गई एक “regular padmasana style” में? क्या ये मेरी गलती है कि ताज मुझे सिखा रहा है कि कैसे बैठना… pic.twitter.com/vKBYjg8ltb
— Shradha Sharma (@SharmaShradha) October 21, 2025
‘ताज हॉटेलने केलं निराश’
या व्हिडीओत महिलेने तिची निराशा खुलेपणे व्यक्त केली. ” या शब्दांमुळे श्रीमंती, क्लास आणि कल्चरचा दर्प येतो.” मी देखील खूप मेहनत करते, पैसे कमावते आणि त्यामुळेच इथे येऊन चांगला अनुभव घेण्याची ,चविष्ट पदार्थ खाण्याची इच्छा होती. मी स्वतःच्या पैशावर जगते, मग कोणालाही यात अडचण का? असा सवालही त्या महिलेने विचारला. ताजने मला खूप ‘निराश’ केलं असंही तिने व्हिडीओमध्ये नमूद केलं.
हा व्हिडिओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिलं की – “एक सामान्य माणूस, जो कठोर परिश्रम करतो, पैसे कमवतो आणि आपल्या प्रतिष्ठेसह ताज हॉटेलमध्ये येतो. त्या व्यक्तीला अजूनही या देशात अपमान सहन करावा लागतो. माझी काय चूक आहे ? मी फक्त ‘नियमित पद्मासन’ शैलीत बसले होते ही चूक आहे का ? मी अशी काय चूक केली की कसं बसायचं आणि काय करायचं हे मला ताजकडून शिकावं लागत आहे ?” असे काही सवाल तिने उपस्थित केले.
हा व्हिडीओ आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिला असून त्यावर नेटीझन्सच्या विविध प्रतिक्रिया येत आहे. काहींनी त्यावर राग व्यक्त केला, इंग्रज तर गेले, पण त्यांचा इंग्रजपणा सोडून गेले, अशा शब्दात एका यूजरने राग व्यक्त केला. जर त्या गेस्टला काही त्रास होत होता, तर त्याने तिथून निघून जायला हवं होतं, अशी कमेंट आणखी एकाने केली. पण काहींना हॉटेलची बाजू पटली. आपण काही जागी जातो, त्यांचे काही विशेष नियम असतात, त्यांचे पालन केले पाहिजे, असं मत काही यूजर्सनी मांडलं.
