कुत्र्यांचा एक ग्रुप समुद्रकिनारी फुग्यासोबत खेळतायत, भारी ना? व्हिडीओ अजून भारी
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कुत्र्यांचा एक ग्रुप समुद्रकिनारी फुगे घेऊन मस्ती करताना दिसत आहे. गुलाबी फुग्यामागे ४-५ कुत्र्यांचा कळप मस्ती करतोय.

सोशल मीडियावर पाळीव प्राण्यांशी संबंधित सुंदर व्हिडिओ आणि फोटो दररोज व्हायरल होत आहेत. विशेषत: कुत्रे आणि मांजरींशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांना आवडतात. यामुळेच जेव्हा जेव्हा या प्राण्यांशी संबंधित कोणताही व्हिडीओ इंटरनेटवर अपलोड केला जातो तेव्हा तो लगेच व्हायरल होतो. असाच एक मजेशीर व्हिडिओ इंटरनेटवर समोर आला आहे ज्यात अनेक कुत्रे फुग्याशी खेळताना दिसत आहेत.
कुत्रे जितके आश्चर्यकारक आहेत तितकेच ते मौजमजा करणारे देखील असतात. कुत्र्यांना इकडे तिकडे धावण्याची सवय असते. ते जास्त वेळ एकाच ठिकाणी बसत नाही आणि एका जागी बसले तरी काही ना काही करतच असतात.
विशेषत: पाण्यात कुत्रे खूप हालचाल करताना दिसतात. पाणी पाहून अनेक कुत्रे पळून जातात, तर अनेक जण पाण्यात खेळतानाही दिसतात. आता पाहा व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ ज्यामध्ये कुत्र्यांचा एक ग्रुप फुग्यांशी खेळताना दिसत आहे
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कुत्र्यांचा एक ग्रुप समुद्रकिनारी फुगे घेऊन मस्ती करताना दिसत आहे. गुलाबी फुग्यामागे ४-५ कुत्र्यांचा कळप मस्ती करतोय.
फुगे घेऊन खेळताना हे कुत्रे समुद्राच्या लाटांमध्ये जातात आणि तिथे या खेळाचा आनंद घेतात. हे सर्व जण कोणत्याही व्हॉलीबॉलपटूप्रमाणे फुगे घेऊन खेळताना दिसतात.
Beach volley pic.twitter.com/IxzhONNoDQ
— Gabriele Corno (@Gabriele_Corno) January 20, 2023
@Gabriele_Corno नावाच्या अकाऊंटने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. बातमी लिहिण्यापर्यंत हा व्हिडिओ चार लाखांहून अधिक लोकांनी पाहिला असून 21 हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाइक केले आहे.
