AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही कोणती अनोखी परीक्षा, जेथे नापास झाल्यास उमेदवारांना आनंद होतो

कोणत्याही परीक्षेत पहिला क्रमांक मिळविण्याची सर्वांची इच्छा असते. परंतू अशाही काही परीक्षा असतात. जेथे उमेदवारांना पास होण्याऐवजी नापास होण्यात अधिक आनंद वाटतो, पाहू या कोणतीही आहे परीक्षा.

ही कोणती अनोखी परीक्षा, जेथे नापास झाल्यास उमेदवारांना आनंद होतो
EXAMImage Credit source: socialmedia
| Updated on: Feb 25, 2023 | 1:31 PM
Share

नवी दिल्ली : जगात कोणत्याही परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवार जीवाचे रान करीत असतात. परीक्षेत जास्त गुण मिळण्यासाठी उमेदवार दिवसरात्र झटत असतात. परंतू एका पदासाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत उमेदवार पास होण्याऐवजी नापास होण्यासाठी जुगाड करीत असतात. अशी कोणती परीक्षा आहे ज्यात नापास होणे हे पास होण्यापेक्षा चांगले मानले जाते. चला मग पाहूया नापास होण्यात आनंद वाटणारी  परीक्षा कोणती  ते ..

देशात एक अशीही परीक्षा असते, त्यात उमेदवारांना पास होण्यासाठी फारसा प्रयत्न करीत नाहीत. या परीक्षेत पास होण्याची कोणाचीही इच्छा नसते. ही परीक्षा असते रेल्वे लोको पायलट रिफ्रेशर कोर्स आणि त्यानंतर होणाऱ्या परीक्षेची. लाईन ड्यूटीवर जाण्यापासून वाचण्यासाठी या परीक्षेत उत्तीर्ण होण्याची कोणाचीच इच्छा नसते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यास लाईन ड्यूटीसाठी बाहेरगावी जावे लागते त्यामुळे लोको पायलटना या परीक्षेस उत्तीर्ण होण्याची इच्छा नसते.

झांसी रेल्वे मंडळात दोन हजाराहून अधिक लोको पायलट आहेत. या सर्व लोको पायलटचा वेळो वेळो रिफ्रेशर कोर्स करवून घेतला जातो. त्यानंतर त्यांची परीक्षा घेतली जाते. जर उमेदवार लोकोपायलट या परीक्षेत पास झाले तर त्यांची ड्यूटी ट्रेनसाठी लावली जाते. जर फेल झाले तर त्यांना स्टेशनवरच इंजिन शंटींगची कामे दिले जातातय किंवा कोणत्यातरी इतर कामासाठी जुंपले जाते. झाशी रेल्वे मंडळात १३ असे पायलट आणि सहायक पायलट असे आढळले जे कधीच पास नाही झाले, त्यामुळे त्यांना कधीच बाहेरगावची लाईन ड्यूटी लागली नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनास संशय आला. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

 रेल्वे प्रशासनास संशय आला

ज्या लोको पायलटची ड्युटी लाइनवर असते, त्यांना बराच काळ घरापासून दूर राहावे लागते. घरापासून लांब न जाण्यासाठी काही लोको पायलट असे जुगाड  करत असतात. हा प्रकार खूप दिवसांपासून सुरू आहे.  या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. झाशी रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज कुमार सिंग यांनी सांगितले की, रेल्वे प्रशासनात वेळोवेळी विविध परीक्षा आणि अभ्यासक्रमांचे आयोजन केले जाते. हाच नियम लोको पायलटना लागू होतो. प्राथमिक तपास सुरू असून, कोणी नियम मोडून वागल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा