ते जग आहे तरी कसे? मृत्यूनंतरच्या जगाचा मनोव्यापार तरी कसा, त्या महिलेने पाहिले तरी काय?
World after death : मृत्यू हे अंतिम सत्य आहे. एकदा मेल्यावर कोणी परत आल्याचे दाखल तसे मिळत नाही. पुनर्जन्माचा आणि तशा घटनांचा दावा करण्यात येतो. पण या महिलेचा अनुभव सर्वांनाच आश्चर्यचकित करणारा आहे. काय पाहिले तिने त्या जगात?

मृत्यू हा अटळ आहे. मृत्यू टाळता येत नाही. जे आले त्यांना तर एक दिवस जावेच लागणार आहे. पण जे लोक मेले असे विज्ञानाच्या भाषेत मानल्या जाते, ते अचानक मृत्यूशय्येवर उठून पण बसतात. काही जण तर मृत घोषित असतात. ते सरणावर अचानक उठून बसतात. अशा लोकांचे त्यांचे त्यांचे अनुभव आहे. अर्थात काही काळ शरीराच्या सर्व क्रिया थांबण्याच्या या प्रकाराला विज्ञानाकडे उत्तर नाही. एक महिला अशीच मृत म्हणून घोषित करण्यात आले. 8 मिनिटांनी ती पण बोलू लागली. या दरम्यान तिने त्या जगाची माहिती दिली, जी आपल्याला अचंबित करणारी आहे.
काय घडली घटना
33 वर्षांची ब्रियाना लॅफर्टी काही मिनिटांसाठी मृत झाली. डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले. जवळपास 8 मिनिटं तिच्या मृतदेहजवळ नातेवाईक रडत होते. तिला मायोक्लोनस डिस्टोनिया नावाचा दुर्मिळ आजार होता. हा एक न्यूरोलॉजिकल आजार आहे. अगदी उमद्या वयात तिला या रोगाने हैराण केलेले आहे. अनेक औषधी घेऊनही तिला फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळे अमेरिकेतील कोलोरॅडो येथील रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले होते.

ब्रियाना लॅफर्टी
मृत्यूनंतरचे जग कसे?
रुग्णालयात तर चार दिवस तिचा डोळ्याला डोळा लागला नाही. तिला वाटलं सर्व आता संपलं. एक दिवस तिची तब्येत अचानक खराब झाली. डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. पण 8 मिनिटानंतर तिची पुन्हा हालचाल झाली. डॉक्टर पण अचंबित झाले. तिने त्यानंतर जे घडले ते सांगितले. ती म्हणाली की, माझा आत्मा शरीर सोडून गेल्याचे मी पाहत होते. मी एकदम शांत होते. माझे दुखणे जणू गायब झाले. मी पूर्वीपेक्षा अधिक सजग आणि ताजेतवाणे झाले होते.
ब्रियाना म्हणाली की, मी त्या विश्वात इतर व्यक्तींना भेटले. पण ते मानवासारखे दिसत नव्हते. ते जग थोडे वेगळेच होते. तिथे एकदम शांत वाटतं होतं. काहीतरी गवसल्याची जाणीव होत होती. पण मध्येच कोणीतरी धक्का दिल्यासारखं झालं आणि मी शरीरात परतले. मृत्यू हा केवळ एक भ्रम आहे. आत्मा कधी मरत नाही. चेतना जिवंत राहते, आपले अस्तित्व केवळ बदलते, असा अनुभव तिने सांगितला
