AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | तहानलेला वाघ जेव्हा जंगलात वाहत्या पाण्यावर आपली तहान भागवतो, व्हिडीओ पाहिल्यावर वाढतंय निसर्ग प्रेम

एका वाघाचे जंगलात दिसणे म्हणजे त्या जंगलातील सृष्टी जीवनचक्र जीवंत आणि शाबूत असल्याचे लक्षण समजले जाते. हा रुबाबदार देखण्या जंगली प्राण्याचा हा व्हिडीओ ट्वीटरवर चांगलाच पाहीला जात आहे.

VIDEO | तहानलेला वाघ जेव्हा जंगलात वाहत्या पाण्यावर आपली तहान भागवतो, व्हिडीओ पाहिल्यावर वाढतंय निसर्ग प्रेम
tiger in bandipur forestImage Credit source: socialmedia
| Updated on: Jul 28, 2023 | 9:20 PM
Share

मुंबई | 27 जुलै 2023 : सध्या भारतात सर्वदूर मान्सूनच्या सरींनी कुठे पुरजन्य परिस्थिती निर्माण केली आहे तर कुठे आल्हाददायक वातावरण तयार केले आहे. पावसाने जुलै महिना चांगलाच गाजवला आहे. पावसाच्या आगमनाने सृष्टीत चैतन्य पसरले असताना कर्नाटक राज्यातील बांदीपूर राष्ट्रीय उद्यानातील एका राजबिंड्या वाघाचा पावसाचे साचलेले पाणी पितानाचा व्हिडीओ समाजमाध्यमावर चांगलाच व्हायरल होत आहे.

बांदीपूर राष्ट्रीय उद्यान कर्नाटक राज्यातील चामराजनगर जिल्ह्यात 868.63 किमी क्षेत्रात पसरलेले राष्ट्रीय उद्यान आहे. येथे 1973 मध्ये प्रोजेक्ट टायगर अंतर्गत व्याघ्र प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. पश्चिम घाटातील म्हैसूर- उटी हायवेवर वसलेल्या या राष्ट्रीय उद्यानातील व्याघ्र प्रकल्पातील एका वाघाचा ओहोळाचे पाणी पितानाचा व्हिडीओ ट्वीटरवर चांगलाच व्हायरल होतो आहे.

येथे पाहा व्हिडीओ-

;

वाघाची संख्या देशात हळूहळू वाढत आहे. एका वाघाचे जंगलात दिसणे म्हणजे त्या जंगलातील सृष्टी जीवनचक्र जीवंत आणि शाबूत असल्याचे लक्षण समजले जाते. हा रुबाबदार देखण्या जंगली प्राण्याचा हा व्हिडीओ ट्वीटरवर चांगलाच पाहीला जात आहे. सर्वसाधारण जंगली पशू तलाव किंवा नदीवर पाणी पित असल्याचे फोटो किंवा व्हिडीओ दिसतात. परंतू या व्हिडीओ आपली मोठी शेपटी वर करुन वाघ पावसाचे पाणी पिताना दिसत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं