AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Local स्टंट मारायला गेला, मरता मरता वाचला!

रेल्वेतून उतरताना किंवा चढताना लोकांना अपघाताला सामोरे जावे लागले आणि त्यांचा जीव गेला. असं असूनही काही लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि अशी चूक करतात.

Mumbai Local स्टंट मारायला गेला, मरता मरता वाचला!
Mumbai local viral newsImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Oct 18, 2022 | 5:08 PM
Share

मुंबई: तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल, ते खूप सोयीस्कर आणि स्वस्तही आहे. पण रेल्वेने प्रवास करताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. त्यातली एक प्रमुख काळजी म्हणजे चालत्या गाडीतून न उतरणे, चालत्या गाडीत न चढणे. अशा अनेक घटना तुम्ही पाहिल्या किंवा ऐकल्या असतील की, रेल्वेतून उतरताना किंवा चढताना लोकांना अपघाताला सामोरे जावे लागले आणि त्यांचा जीव गेला. असं असूनही काही लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि अशी चूक करतात. कधी ती चूक असते, कधी मुद्दाम करतात. एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, बघून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

खरंतर या व्हिडीओमध्ये एक माणूस चालत्या ट्रेनमधून खाली उतरण्याच्या प्रयत्नात अचानक खाली पडतो, पण या अपघातात त्याला काहीच होत नाही.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ट्रेन प्लॅटफॉर्मवरून जात आहे आणि त्यात किती लोक आहेत. ट्रेनच्या आत जागा नाही, म्हणून लोक दारावर लटकत आहेत.

दरवाजाला लटकलेल्या अशाच एका व्यक्तीने फलाटावर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेनमधून खाली उतरण्याचा प्रयत्न केला, बराच वेळ गेल्यावर तो खाली पडला. सुदैवाने त्याचे पाय किंवा हात ट्रेनच्या चाकाजवळ जात नव्हते, अन्यथा त्याला गंभीर दुखापत झाली असती किंवा जीव गमवावा लागला असता.

अशी चूक अजिबात करू नये. मुंबईतील रेल्वे स्टेशनवर ही घटना घडली आहे. हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @RoadsOfMumbai नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे.

Follow Us
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय....
Sharad Pawar Health Update : शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या सुरू
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
Shiv Sena Symbol Row : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
Payal Zambare Case : पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
Umesh Patil On Rohit Pawar : आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित पवारांना थेट सवाल
राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....
NCP Meeting Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या खात्यांबाबत उपस्थित केले प्रश्न
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल