AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घराघरातल्या बायका, पोरींना ज्या गाण्यानं देशभर वेड लावलं ते कच्चा बादामची गोष्ट तुम्हाला माहितीय?

Who is Kacha Badam singer : कौटुंबिक जबाबदाऱ्यांनी गायक होण्याचं भुबनचं स्वप्न अधुरं राहिलं होतं. त्यानंतर कुटुंबाची जबाबदारी आल्यानं आपल्या कामावेळीच त्यानं सूरांना आपला दोस्त बनवलं.

घराघरातल्या बायका, पोरींना ज्या गाण्यानं देशभर वेड लावलं ते कच्चा बादामची गोष्ट तुम्हाला माहितीय?
व्हायरल गाणं कच्चा बादामचा सिंगर नेमका कोणंय? कुठलाय? जाणून घ्या
| Updated on: Feb 05, 2022 | 3:07 PM
Share

‘कधी बसपन का प्यार’ हीट होतं. तर कधी कच्चा बदाम! हीट होणाऱ्या गोष्टींच्या मुळाशीही जायला हवंच. म्हणून आता कच्चा बदाम गाणं नेमकं आलं कुठून हेही जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. अशावेळी सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर कच्चा बदाम (Kaccha Badam Viral song) गाण्याचे रिल्स करणाऱ्या, त्यावर थिरकणाऱ्या घराघरातल्या बायका आणि पोरींना वेड लावणारं हे गाणं इतकं खास कसं बनलं, त्याचीही गोष्ट समजून घेऊयात. अनेकांना हे गाणं गाणारा सिंगर कोण आहे, हे तर लक्षात आलं असेलही. पण तो फेमस कसा झाला? त्याचे रील्स बनावेत, इतकी डिमांड त्याला का आली, याचा किस्साही भारी आहे. व्हायरल होणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे एक खास किस्सा असतो. तसाच तो कच्चा बदामचाही आहे. बंगालच्या बीरभूम जिल्ह्यात शेंगदाणे विकणाऱ्यानं गायलेलं गाणं इतकं हिट होईल, असं त्याला स्वप्नातही वाटलं नसेल. शेगदाण्याला कच्चा बदाम म्हणणाऱ्या भुवनला (Bhuban Badyakar) रातोरात स्टार कुणी केलं? घराघरातल्या बायका, पोरी तर सोडाच, पण सेलिब्रिटीही कच्चा बदामवर थिरकू लागले. हे सगलं चकीत करणारंच तर आहे! त्यामुळे भुबनला स्टार करणाऱ्या मास्टरमाईंटचाही शोध घ्यावा लागेलच की!

संपूर्ण नाव भुबन बड्याकर. राहणार, जिल्हा बीरभूम राज्य बंगाल. बंगाली भुवनचं गाणं सोशल मीडियात हिट झालंय. पण त्याचं सगळ्यात पहिलं गाणं युट्युबवर आलं होतं नोव्हेंबर 2021ला. आपल्या गाण्याला मिलियनमध्ये व्हूज मिळालेत, याची तर भुबनला पुसटीशी कल्पना नव्हती. एक माणूस आला. तेव्हा भुबन हे गाणं गात होता. या माणसानं त्याचं कौतुक केलं. व्हिडीओ बनवला आणि युट्युबवर अपलोड करुन टाकला. ज्या माणसानं हा व्हिडीओ बनवला, तो कोण होता, हे विचारण्याची तसदीसुद्धा भुबनने घेतली नाही.

रिमिक्सची कमाल, युजर्सची धमाल

गायक आणि संगीतकार नज्मू रीचॅनं या गाण्याला आपला टच दिला. हे हाण रिक्रीएट करत त्याला रिमिक्स करुन टाकला. इन्स्टाग्रामवर अपलोड केलेल्या या गाण्याला लोकांनी चांगलंच डोक्यावर घेतलं. लोकांना थिरकायला भाग पाडेल, तेच खरं संगीत असं म्हणतात. आता कच्चा बदामच्या रिमिक्स वर्जननं लोकं थिरकली आणि बघता बघता सुरु झालं कच्चा बदाम डान्स चॅलेंज!

इंटरेस्टिंग गोष्ट तर याच्याही पुढे आहे. फक्त भारतातच नव्हे, तर दक्षिण कोरीया, टांझानियासह परदेशातही लोकं कच्चा बादामवर ठेका धरू लागली होती. काहीजण तर भुबनपर्यंत पोहोचली. त्याच्यासोबत व्हिडीओ काढण्यासाठीही लोकांची लाईन लागली!

…आणि कच्चा बादामच पिकला!

भुबन बड्याकरचं असं म्हणणंय की त्याला पहिल्यापासून गायक व्हायचं होतं. आता लोक त्याच्याकडून इथरही गाण्याची अपेक्षा करत आहेत. अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्यात. लोकांचं प्रेम पाहून भुबनही भारावून गेलाय. एक शेंगदाणे विकणाऱ्याकडे संगीतकार म्हणून लोक पाहू लागले, ही तर सोशल मीडियाचीच जादू आहे. अर्थात प्रसिद्धीसाठी त्यानं यातलं काहीच केलेलं नाही.

कौटुंबिक जबाबदाऱ्यांनी गायक होण्याचं भुबनचं स्वप्न अधुरं राहिलं होतं. त्यानंतर कुटुंबाची जबाबदारी आल्यानं आपल्या कामावेळीच त्यानं सूरांना आपला दोस्त बनवलं. अर्थात जबाबदारी आली म्हणून त्यांनी स्वप्नांची साथ सोडली नाही. शेंगदाणे विकताना त्यानं आपली गाणं सुरु ठेवलं. त्याच गाण्यानं आज त्याला व्हायरल करुन ठेवलंय. भुबन बड्याकर आता इतका प्रसिद्ध झालाय, की चक्क सौरभ गांगुलीच्या क्विज शोमध्ये त्याला आमंत्रित करण्यात आलंय. दादागिरी अनलिमिटेड 9 मध्येही आता भुबन दिसणार आहे.

View this post on Instagram

A post shared by tube.indan (@tube.indians)

संबंधित बातम्या :

राणू मंडल यांनी सुरात गाण्याचा प्रयत्न केला Kacha Badam; पण यूझर्स उडवतायत खिल्ली, पाहा Video

Dancing Dadलाही Kacha Badamची भुरळ, मुलासह दिला जबरदस्त परफॉर्मन्सनंतर! यूझरच्याही मजेशीर कमेंट्स

Trending बंगाली गाणं Kacha Badamवर एअर होस्टेसनं केला फ्लाइटमध्येच डान्स, Video Viral

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.