AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Oyo : ते एक चुकीचं पाऊल आणि… BoycottOYO चा ट्रेंड का सुरू आहे ?

हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील दिग्गज असलेल्या OYO ला सध्या सोशल मीडियावर जोरदार विरोधाचा सामना करावा लागत आहे. सध्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर BoycottOYO हा टॉप ट्रेंडिंग विषय बनला आहे. रितेश अग्रवालच्या नेतृत्वाखालील OYO ने असं काय केलं ज्यामुळे लोक तुटून पडलेत ते जाणून घेऊया.

Oyo : ते एक चुकीचं पाऊल आणि... BoycottOYO चा ट्रेंड का सुरू आहे ?
| Updated on: Feb 22, 2025 | 1:50 PM
Share

X (पूर्वीचं ट्विटर) असो की फेसबूक किंवा सोशल मीडियाचा अन्य कोणताही प्लॅटफॉर्म असो , सध्या सगळीकडे BoycottOYO हा ट्रेंडिंग आहे. OYO चे मालक रितेश अगरवाल यांनी माफी मागावी अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे. खरंतर हे सर्व OYO च्या त्या जाहिरातीमुळे झालं आहे, जी हिंदी वर्तमानपत्रात अर्ध्या पानावर छापली गेली आहे. OYO च्या या जाहिरातीमुळे आपल्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे सोशल मीडियावरील लोकांचे म्हणणे आहे.

सोशल मीडियावर OYO च्या या जाहिरातीला अनेक संस्थांकडून तसेच सर्वसामान्यांकडून विरोध केला जात आहे. खरं तर, कपल्सना किंवा जोडप्यांना स्वस्तात खोल्या उपलब्ध करून देणारी कंपनी अशी OYO ची ओळख आहे. मात्र आता कंपनी आपली हीच प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनी आपली प्रतिमा सुधारण्यासाठी जाहिरातींवर मोठा खर्च करत आहे. पण, एका जाहिरातीमुळे त्यांचा हा डाव त्यांच्यावरच उलटा पडतोय की काय अशी चिन्हं दिसू लागली आहेत .

ब्रँडिंगमध्ये बदल

OYO ची ब्रँडिंग स्ट्रॅटेजी आतापर्यंत तरुणांवर केंद्रित होती. आता कंपनीला तिचे ब्रँडिंग ही कुटुंबासाठी अनुकूल अशी हॉस्पिटॅलिटी चेन म्हणून करायचे आहे. यासाठीच कंपनीने प्रादेशिक चालीरीती आणि श्रद्धांचा आदर करण्याच्या नावाखाली अनेक ठिकाणी बुकिंग घेण्यास आणि अविवाहित जोडप्यांना रूम देण्यास नकार दिला आहे. पण, त्यांच्या एका जाहिरातीमुळे या मेहनतीवर पाणी फेरले जाण्याची शक्यता दिसत आहे.

काय आहे जाहिरात ?

हिंदी आणि इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये छापलेल्या जाहिरातीमध्ये दिलेली टॅगलाइन आहे, “देव सर्वत्र आहे” “आणि OYO सुद्धा” असं त्या खाली लिहीण्यात आलं आहे. खरंतर, कंपनीला OYO च्या व्यापक उपस्थितीचा प्रचार करायचा होता. पण देवासोबत केलेली ही तुलना अनेक हिंदू समूहांना आवडली नाही. यामुळे आपल्या धार्मिक भावनांचा अपमान झाल्याचे सांगत त्यांनी विरोध सुरू केला आहे. अनेकांनी तर ओयोचा लोगो हा भगवान जगन्नाथ यांच्या डोळ्याशी आणि कपाळाशी जोडला आणि ओयो छुप्या पद्धतीने हिंदूंच्या भावना दुखावत असल्याचाही केला आहे.

ओयोने दिलं स्पष्टीकरण

जेव्हा सोशल मीडियावर विरोध वाढला तेव्हा ओयोने या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले. या जाहिरातीतून कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नव्हता.पण धार्मिक पर्यटन वाढवणं हा आमचा उद्देश होता, असं त्यांनी स्पष्ट केलं. भारतातील धार्मिक विविधता आणि समृद्ध आध्यात्मिक परंपरांचा आमची कंपनी पूर्ण आदर करते, असेही द्वारे सांगण्यात आले.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.