AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GF सोबत कारमध्ये बसला, बायकोने पाहिलं अन् पतीने थेट बोनेटवरच…पत्नीला 200 मीटर फरफटत नेलं!

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. नवरा गर्लफ्रेंडसोबत कारमध्ये मस्त मजेत बसला होता. तेवढ्यात बायकोने पाहिले आणि नंतर जे घडलं ते पाहून सर्वजण थक्क झाले.

GF सोबत कारमध्ये बसला, बायकोने पाहिलं अन् पतीने थेट बोनेटवरच...पत्नीला 200 मीटर फरफटत नेलं!
A shocking CCTV videoImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 08, 2026 | 5:47 PM
Share

पती-पत्नी आणि प्रेयसी यांच्यात झालेला वाद आता चर्चेचा विषय बनला आहे. या घटनेचा एक सीसीटीव्ही (CCTV) व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक महिला कारच्या बोनेटवर लटकलेली दिसत आहे, तर कार रस्त्यावर सुसाट धावत आहे. असे सांगितले जात आहे की, बोनेटवर लटकलेली महिला ‘गुलाबो’ असून कार चालवणारा व्यक्ती तिचा पती ‘नेत्रपाल’ होता. या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर लोकांमध्ये विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. महिलेच्या तक्रारीवरून भमोरा पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

प्रेयसीसोबत पतीला पाहून पत्नीचा संताप

गुलाबो आपल्या मुलासोबत देवचरा चौकात उभी होती. त्याचवेळी संध्याकाळी सातच्या सुमारास तिचा पती नेत्रपाल कारने तिथे पोहोचला. असा आरोप आहे की, त्याच्यासोबत कारमध्ये एक महिलाही बसली होती, जी त्याची प्रेयसी होती. पत्नीने आपल्या पतीला दुसऱ्या महिलेसोबत पाहताच तिला प्रचंड राग आला आणि ती कार थांबवण्यासाठी आरडाओरडा करू लागली. मात्र, नेत्रपालने कार थांबवली नाही आणि तो पुढे निघून गेला. यानंतर गुलाबो कारच्या मागे धावू लागली.

आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोकांची नजरही या संपूर्ण प्रकारावर पडली. नेमका काय प्रकार सुरू आहे हे लोकांना समजत नव्हते, पण ती महिला सतत कार थांबवण्याचा प्रयत्न करत होती. फुलमंडी जवळ रस्त्यावर असलेल्या स्पीड ब्रेकरमुळे कारचा वेग थोडा कमी झाला. याच दरम्यान गुलाबोने हिंमत दाखवत थेट कारच्या बोनेटवर उडी मारली आणि स्वतःला कारसमोर आणले जेणेकरून कार थांबेल. परंतु, असे असूनही नेत्रपालने कार पुढे रेटली.

वाटसरूंनी पाठलाग करून थांबवली कार

कारच्या बोनेटवर एका महिलेला लटकलेले पाहून रस्त्यावरील लोकांना धक्काच बसला. अनेक लोकांनी तात्काळ दुचाकीवरून कारचा पाठलाग सुरू केला. सुमारे २०० मीटर पुढे देवचरा-बल्लिया रोडवर लोकांनी कार थांबवली. कार थांबताच जमावाने नेत्रपालला बाहेर काढले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, लोकांनी त्याला चांगलाच चोप दिला. घटनास्थळी बराच वेळ गोंधळाचे वातावरण होते. याच दरम्यान, नेत्रपाल आणि त्याच्यासोबत असलेली महिला संधी साधून तिथून पसार झाले.

या घटनेचा व्हिडीओ आजूबाजूला लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्येही कैद झाला आहे. हाच व्हिडीओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. दुसरीकडे, गुलाबोने या संपूर्ण प्रकरणाची तक्रार भमोरा पोलिसांत दिली आहे. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे नेत्रपालविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाबाबत ‘एसपी साऊथ’ अंशिका वर्मा यांनी सांगितले की, एका महिलेला कारच्या बोनेटवर लटकवून नेल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. महिलेचे नाव गुलाबो आहे. महिलेच्या तक्रारीवरून तिचा पती नेत्रपाल याच्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.

Follow Us
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं सत्य;  डिजेच्या तालावर...
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनी धुराच्या लोटात
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनीत धुराचे लोट, मोठी दुर्घटना टळली
अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
Dcm Sunetra Pawar | मोबाईलमध्ये व्यस्त, कामात हलगर्जीपणा! अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर...
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर विधान करणं भोवलं!
36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
Datta Bharne | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा? कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत; उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत;  उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी सांगितलं बैठकीत काय घडलं?
मोठी बातमी! मुंबईतील सर्व खासगी पाणी टँकर सेवा बंद करण्याचा इशारा
मोठी बातमी! मुंबईतील सर्व खासगी पाणी टँकर सेवा बंद करण्याचा इशारा
काही लोकं तर फक्त ... एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता...
काही लोकं तर फक्त ... एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता...
परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर....
Parbhani | परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर, गावकऱ्यांची मदतीसाठी आर्त हाक!
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ!