AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगाचा अंत जवळ आलाय? नोव्हेंबर 2026 मध्ये… भविष्यवाणी खरी ठरली तर सगळं काही संपणार?

World End Prediction : सोशल मीडियावर जगाचा अंत होणार असल्याचा दावा वेगाने व्हायरल होत आहे. हा मेसेज खरा आहे की खोटा याबाबतचे सत्य आता समोर आले आहे, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

जगाचा अंत जवळ आलाय? नोव्हेंबर 2026 मध्ये... भविष्यवाणी खरी ठरली तर सगळं काही संपणार?
World EndImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 17, 2026 | 9:21 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जगाचा अंत होणार असल्याचा दावा वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या काही पोस्टमध्ये असा दावा केला जात आहे की, वैज्ञानिकांनी अनेक वर्षांपूर्वीच 13 नोव्हेंबर 2026 रोजी जगाचा अंत होऊ शकतो, अशी भविष्यवाणी केली होती. या दाव्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली असून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. अशातच आता या जुन्या संशोधनाचा आणि वैज्ञानिक मॉडेलचा सखोल अभ्यास केल्यानंतर वेगळीच वस्तुस्थिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

जगाचा अंत होणार हा दावा कसा सुरू झाला?

जगाचा अंत होणार असा व्हायरल होत असलेला दावा 1960 मध्ये करण्यात आलेल्या एका वैज्ञानिक संशोधनाशी संबंधित आहे. इलिनॉय विद्यापीठातील शास्त्रज्ञ हेन्झ वॉन फोरस्टर, पॅट्रीसिया मोरा आणि लॉरेन्स एमिओट यांनी त्या काळात जगातील वाढत्या लोकसंख्येवर संशोधन केले होते. त्यांनी सुमारे 2000 वर्षांच्या लोकसंख्येच्या आकडेवारीचा अभ्यास केला आणि जगाची लोकसंख्या अत्यंत वेगाने वाढत असल्याचे निरीक्षण नोंदवले. या संशोधनात एक गणितीय मॉडेल तयार करण्यात आले होते. त्या मॉडेलनुसार जर लोकसंख्या अशीच वेगाने वाढत राहिली, तर 13 नोव्हेंबर 2026 पर्यंत परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

खरंच जगाचा अंत होणार होता का?

महत्त्वाची बाब म्हणजे वैज्ञानिकांनी कधीही असे म्हटले नव्हते की 2026 मध्ये पृथ्वी नष्ट होईल किंवा प्रलय येईल किंवा जगाचा अंत होईल. त्यांच्या संशोधनाचा उद्देश हा होता की, जर लोकसंख्या नियंत्रणाशिवाय वाढत राहिली, तर पृथ्वीवरील संसाधनांवर प्रचंड ताण निर्माण होऊ शकतो. म्हणजेच अन्नटंचाई, गर्दी, पर्यावरणीय संकट आणि जीवनातील अडचणी मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. त्या संशोधनात अनंत लोकसंख्या (Infinite Population) असा शब्दप्रयोग प्रतिकात्मक इशारा म्हणून वापरण्यात आला होता. ती जग संपण्याची तारीख नव्हती. त्यामुळे जगाचा अंत होणार नाही.

आता वैज्ञानिकांचे म्हणणे काय?

1960 च्या तुलनेत जग आता बदलले आहे. पृथ्वीवरील लोकसंख्या 8 अब्जांहून अधिक झाली आहे, मात्र लोकसंख्या वाढीचा वेग कमी होत चालला आहे. UN च्या अंदाजानुसार, जगाची लोकसंख्या 2080 च्या आसपास उच्चांक गाठू शकते आणि त्यानंतर हळूहळू घटू लागेल.

पृथ्वी मानवांसाठी कधी धोकादायक बनेल?

नवीन संशोधनानुसार, सुमारे 1 अब्ज वर्षांनंतर सूर्याच्या वाढत्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे महासागर कोरडे पडू शकतात आणि तापमान इतके वाढेल की जीवन शक्य राहणार नाही. मात्र हा दावा सध्याच्या परिस्थितीला अनुरूप आहे, मात्र आगामी काळात यात बदल होऊ शकतो.

सोशल मीडियावर हा विषय पुन्हा व्हायरल का?

समोर आलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर अनेकदा जुन्या वैज्ञानिक संशोधनांची अपूर्ण किंवा चुकीची माहिती शेअर केली जाते. त्यामुळे 2026 संबंधीची ही जुनी लोकसंख्या थिअरी व्हायरल झाली आणि अनेकांचा हा जगाच्या अंताची भविष्यवाणी असल्याचा समज झाला. मात्र हे संशोधन वाढती लोकसंख्या आणि संसाधनांवरील ताण याबाबतचा इशारा होता.

Follow Us
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?
फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; गांधींचा ज्ञानेश कुमारांवर....
Rahul Gandhi : फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप, म्हणाले...
हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला
honey singh : हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला गैरहजर
आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण
Sanjay Shirsat : आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; संजय शिरसाटांच्या त्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?