AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिला आहे म्हणून पार्टीला बोलवणं टाळू नका नाही तर तु्म्हालाही द्यावी लागेल 70 लाखाची भरपाई…

कोणावरही भेदभाव केल्याचा आरोप केला तर कोणत्याही पुराव्याशिवाय त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. त्यानंतर काही दिवसांनी न्यायालयाने हा निर्णय दिला आहे, त्यामध्ये तिला कंपनीकडून 70 लाखाची नुकसान भरपाई देण्यास सांगितले आहे.

महिला आहे म्हणून पार्टीला बोलवणं टाळू नका नाही तर तु्म्हालाही द्यावी लागेल 70 लाखाची भरपाई...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: May 26, 2022 | 5:25 PM
Share

नवी दिल्लीः एक महिलेला ऑफिस पार्टीसाठी (Office Party) तिच्या सहकार्यानी तिला बोलवलं नाही. आपल्या पार्टाली बोलवलं नाही म्हणून त्या महिलेनं थेट न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर महिलेचे म्हणणे न्यायालयाने ऐकून घेतले. महिलेचे मत ध्यानात घेऊन कंपनीलाचीही चौकशी (company  inquired) करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने (Court) जो निर्णय दिला त्या निर्णयाने कंपनीला एक नाही दोन नाही तर तब्बल 70 लाखाची नुकसान भरपाई देण्यास सांगितले.

एका कंपनीचा सगळा ऑफिस स्टाफ पार्टी करण्यासाठी गेला होता, सगळा स्टाफ पार्टीसाठी गेला असला तरी त्या ऑफिसमध्ये असणारी एका महिलेलाच फक्त पार्टीसाठी बोलवण्यात आलं नाही.

महिलेची थेट न्यायालयात धाव

त्यानंतर मात्र ती महिलेनं थेट न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी झाली आणि न्यायालयाने कंपनीला तब्बल 70 लाखाची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.

एकटीलाच कोणीही बोलवले नाही

ही घटना घडली आहे ती ब्रिटनमध्ये, ब्रिटनमधील 51 वर्षाच्या रिता लेहर स्ट्रॅटफोर्ड येथील एस्पर्स कॅसिनोविरुद्ध न्यायालयात धाव घेतली होती. त्या कंपनीत ती कॅशियर म्हणून काम करायची. यावेळी रिटाने सांगितले की, ऑफिसमधील सर्वजण मला एकटीलाच सोडून कोणताही कार्यक्रम करत होते. कंपनीची ज्या दिवशी पार्टी होती, त्यादिवशी तिचे सगळे सहकारी पार्टीला गेले मात्र तिला एकटीलाच कोणीही बोलवले नाही. त्यामुळे हे प्रकरण तिने न्यायालयात दाखल केले होते.

कर्मचार्‍यांविरुद्ध भेदभावाची तक्रार

न्यायालयाच्या निर्णयानुसार, रिटा यांना पार्टीसाठी आमंत्रित करण्यात आले नव्हते, कारण तिने यापूर्वीही इतर कर्मचार्‍यांविरुद्ध भेदभावाची तक्रार दाखले केली होती. त्यावेळी तिने कंपनीविरुद्ध वय आणि वंशाच्या आधारे छळ आणि भेदभावाची तक्रार दाखल केली होती.

पुराव्याशिवाय त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई

नोव्हेंबर 2011 पासून रिटा सुपर-कसिनोमध्ये काम करत आहे. हा UK मधील दुसरा सर्वात मोठा कॅसिनो आहे, या कॅसिनोमध्ये सुमारे 560 कर्मचारी आहेत. तपासादरम्यान, हे देखील उघड झाले की रीटाने भेदभावाची तक्रार केल्यानंतर कॅसिनोच्या एका कर्मचाऱ्याने तिला या संदर्भात धमकावण्यात आले होते. मग त्याला सांगण्यात आले की जर त्याने पुन्हा कोणावरही भेदभाव केल्याचा आरोप केला तर कोणत्याही पुराव्याशिवाय त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. त्यानंतर काही दिवसांनी न्यायालयाने हा निर्णय दिला आहे, त्यामध्ये तिला कंपनीकडून 70 लाखाची नुकसान भरपाई देण्यास सांगितले आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?