महिलेला दरवाजाजवळ सापडली चिठ्ठी… तिसरी ओळ वाचताच बसला करंट; काय होतं असं त्यात?
एका महिलेला तिच्या दरवाजाजलळ एक निनावी चिट्ठी सापडली आहे. यातील मजकूर तिच्यासाठी धक्कादायक आहे. या पत्रात नेमकं काय लिहिलं आहे ते जाणून घेऊयात.

अपार्टमेंटमध्ये राहणे सुरक्षित आहे, मात्र येथील रहिवाशांना काही समस्यांचाही सामना करावा लागतो. बऱ्याचदा मोठ्याने बोलताही येत नाही. अशातच आता अमेरिकेत एका महिलेला तिच्या दरवाजाजलळ एक निनावी चिट्ठी सापडली आहे. यातील मजकूर तिच्यासाठी धक्कादायक आहे. या चिठ्ठीत महिलेला तू रात्री उशिरा आवाज करते त्यामुळे आम्हाला त्रास होतो असं नमूद करण्यात आले आहे. महत्वाची बाब म्हणजे या महिलेने कोणताही आवाज केला नव्हता, मात्र तरीही तिला हे पत्र आल्याने ती गोंधळून गेली.
तुम्ही अनेकदा पाहिले असेल की अपार्टमेंटमध्ये राहणारे लोक अनेकदा शेजाऱ्याने आवाज केल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे एकमेकांच्या तक्रारी करत असतात. अशातच अमेरिकेत राहणाऱ्या एका महिलेला घरात आवाज केल्याबद्दल शेजाऱ्याने एक चिठ्ठी पाठवली आहे. या चिठ्ठीत या महिलेला रात्री उशिरा आवाज केल्याबद्दल आणि ड्रायर चालवल्याबद्दल विचारणा करण्यात आली आहे. हे पत्र संबंधित महिलेने रेडिटच्या आर/अपार्टमेंटलिव्हिंग ग्रुपमध्ये शेअर केले आहे.
या महिलेल्या मिळालेल्या पत्रात लिहिले आहे की, “प्रिय शेजारी, काल रात्री 10 ते 11.30 पर्यंत मोठ्या आवाजात गाणी लावल्याबद्दल धन्यवाद. माझी पहाटे 2 वाजताची शिफ्ट होती, मात्र यामुळे माझी झोप पूर्णपणे विस्कळीत झाली. हे लक्षात ठेवा की तुम्ही खाजगी मालकीच्या घरात नाही तर अपार्टमेंटमध्ये राहता. येथे पहाटे 3 वाजता ड्रायर चालवण्यास मनाई आहे. धन्यवाद!”
महिलेला बसला धक्का
महिलेला ही चिठ्ठी मिळाल्यानंतर तिला धक्का बसला. तिने म्हटले की, ‘मी कधीही मोठ्या आवाजात गाणी वाजवली नाहीत आणि मध्यरात्री ड्रायर चालवला नाही. ही चिठ्ठी माझ्यासाठी का ठेवली? मला माहित नाही की कोणत्या शेजाऱ्याने ती ठेवली आहे. हा शेजारी वरच्या मजल्यावरील आहे की खालच्या हेही माहिती नाही.’ पुढे बोलताना या महिलेने सांगितले की, माझी शेजारीण कधीकधी गाणी लावते, मात्र तो आवाज त्रासदायक नसतात. अपार्टमेंटमध्ये हा आवाज सामान्य मानला जाऊ शकतो.’
ही महिला एकटी राहत असल्याने हे पत्र तिला अस्वस्थ करणारे आहे. या महिलेला वाटले की, काही शेजारी तिला जाणूनबुजून त्रास देत आहेत. तिने रेडिटवर लोकांना प्रश्न विचारला की, “नाव न सांगता असे पत्र दारासमोर सोडणे सामान्य आहे का? हा योग्य पर्याय आहे का? आता मी काय करावे?’
नेटकऱ्यांनी काय म्हटले?
या महिलेच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी आपापली मते व्यक्त केली आहेत. एकाने म्हटले की, ‘ही चिठ्ठी दुसऱ्या शेजाऱ्याच्या दाराखाली ठेवा आणि आणखी राडा होऊ द्या.’ यावर दुसऱ्याने म्हटले की, ‘कदाचित हेच कारण असेल की ही चिठ्ठी तुमच्याकडे आली आहे. कदाचित दुसऱ्या कोणीतरी हे आधीच केले असेल.’ त्याचबरोबर काही नेटकऱ्यांनी या महिलेला चांगला सल्ला दिला आहे. एकाने म्हटले की, ‘हे पत्र तुमच्या घरमालकाला दाखवा. त्यांना सांगा की हे पत्र माझ्यासाठी नाही. मला या घटनेने अस्वस्थ वाटत आहे. त्यांच्याकडे हे पत्र द्या आणि काय करायचे ते त्यांना ठरवू द्या.’
