अचानक बंद झाले बँकेचे सर्व कार्ड, रद्द झाला पासपोर्ट, बँकेने जे कारण सांगितले ते ऐकून महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली…
मित्रांनो तुम्हाला सरकारी बाबूंच्या प्रतापाचा फटका केव्हा ना केव्हा तरी बसला असेलच...आपल्या देशात हे काही नवीन नाही. येथे काही होऊ शकते.

जर सरकारी कारभाराचा फटका केवळ भारतातच बसू शकतो असा तुमचा समज असेल तर तुम्ही चुकीचे आहात. सरकारी यंत्राणांच्या लालफितीशाही कारभाराचा वा निष्काळजीपणाचा फटका तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहू शकतो. अशा घटना परदेशातही घडत असतात, असाच प्रकार एका महिलेच्या बाबतीत घडला आहे. चला तर पाहूयात ही नेमकी घटना काय आहे.
मित्रांनो तुम्हाला सरकारी बाबूंच्या प्रतापाचा फटका केव्हा ना केव्हा तरी बसला असेलच…आपल्या देशात हे काही नवीन नाही. येथे काही होऊ शकते. परंतू लंडनमध्ये ही गोष्ट घडली असेल तर तुम्ही काय म्हणाल…लंडनमध्ये एका महिलेसोबत असे घडले की तुम्ही देखील विचारात पडला. असे कसे होऊ शकते.
तुम्ही लोकांसोबत घडलेल्या अनेक अपघातांना ऐकूण असालच…परंतू तु्म्हा तुमच्या तोंडासमोर कोणी सांगितले का की तुमचा मृत्यू झाला आहे. तर सेंकदभर तुम्हाला तुमच्या अस्तित्वाबद्दलच प्रश्न पडेल. असाच काहीसा प्रकार एका महिले सोबत घडला आहे. एका क्षणात त्यांना कागदोपत्री मृत घोषीत करण्यात आले. स्वत:ची प्रायव्हेट फर्म चालविणारी मासिथोकोजे मोयो यांच्या सोबत घडलेला अजब प्रकार खूपच चर्चेत आहे.




मॅडम, तुमचा तर कधीच मृत्यू झाला आहे?
मासिथोकोज़े मोयो ( Masithokoze Moyo ) नावाच्या लंडन येथील ४५ वर्षांच्या महिलेला हा भयानक अनुभव आला आहे. ती इंग्लंडच्या मोयो इंग्लंड च्या किडरमिंस्टरमध्ये राहाते. एक दिवशी त्यांचे क्रेडिट कार्डने अचानक काम करणे बंद केले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या बँकेत फोन केला. तेव्हा त्यांना जी माहीती मिळाली ती एखाद्या हादऱ्यांहून कमी नव्हती. मोयो यांना बँकेने सांगितले की त्यांचा मृत्यू झालेला आहे. बँकेने त्यांचा पासपोर्ट आणि वाहन परवाना देखील रद्द करण्यात आला. त्यामुळे त्यांना त्यांचेच पैसे काढता येईना…शेजारच्यांकडून उधारी काढून दिवस ढकलावे लागले….
छोट्या चुकीचा एवढा मोठा फटका
वास्तविक ५ फेब्रुवारी रोजी या महिलेने आपल्या बँकेला डायरेक्ट डेबिटला रद्द करण्याची रिक्वेस्ट पाठवली होती. हे काम तर झाले. परंतू ज्या एजंटने त्यांच्याशी बोलणी केली होती. त्याने खातेदाराचा मृत्यू झाल्याचे कारण बँकेला कळवले. त्यामुळे त्यांच्या सर्व कागदपत्रांवर त्यांना मृत घोषीत केले गेले. त्यांना ही बाब निस्तरण्यासाठी तब्बल १६ दिवस खर्ची झाले. आणि २१ फेब्रुवारी रोजी त्या अखेर खाते वापरण्यासाठी त्या पात्र झाल्या. या सर्व मानसिक त्रासाबद्दल बँकेवर ५६ कोटीचा नुकसान भरपाईचा दावा ठोकला आहे. बँकेने झालेल्या प्रकाराबद्दल त्यांची दीलगिरी व्यक्त केली आहे. परंतू कोणतीही नुकसान भरपाईबद्दल एक अक्षरही काढलेले नाही.