Video | निळी साडी नेसून थरारक स्केटिंग, 46 वर्षीय महिलेचा व्हिडीओ व्हायरल

महिलेचे वय 46 वर्षे आहे. असे असले तरी ती अजूनही थकलेली नाही. ही महिला मोठ्या थाटात स्केटिंग करते आहे.

Video | निळी साडी नेसून थरारक स्केटिंग, 46 वर्षीय महिलेचा व्हिडीओ व्हायरल
एका 46 वर्षीय महिलेचा थक्क करणारा व्हिडीओ चर्चेचा विषय ठऱतो आहे.

मुंबई : सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. मात्र, यातील काही व्हिडीओ हे अतिशय चकित करणारे असतात. या जगात एकापेक्षा एक कलाकार आणि करामती लोक आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्या याच कलाकारीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या एका 46 वर्षीय महिलेचा थक्क करणारा व्हिडीओ चर्चेचा विषय ठऱतो आहे. या महिलेचे वय 46 वर्षे असले तरी ती अतिशय चांगल्या प्रकारे स्केटिंग करताना दिसत आहे. (women 46 year old skating very smoothly video went viral on social media)

वय 46 वर्षे तरी स्केटिंगमध्ये तरबेज

सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा एका महिलेचा आहे. ही महिला 46 वर्षांची आहे. चाळीशी पार केली की शरीराच्या हालचाली कमी होतात. लठ्ठपणा तसेच इतर अनेक आजार जडायला सुरुवात होते, असं म्हटलं जातं. मात्र, व्हिडीओतील महिला याला अपवाद आहे. या महिलेचे वय 46 वर्षे आहे. असे असले तरी या महिलेतील उत्साह अजूनही टिकून आहे. ही महिला मोठ्या थाटात स्केटिंग करते आहे.

साडी नेसून स्केटिंग

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ही महिला स्केटिंग करत आहे. इन्स्टाग्रामवर या महिलेचे स्केटिंग करतानाचे अनेक व्हिडीओ उपलब्ध आहेत. मात्र, सध्या या महिलेचा एक विशेष व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये महिलेने निळ्या रंगाची साडी परिधान केलेली आहे. तसेच डोक्यावरसुद्धा निळेच हेल्मेट घातले आहे. ती अतिशय मजेत आमि अस्खलीतपणे स्केटिंग करत आहे.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Aunty Skates (@auntyskates)

या महिलेचा व्हिडीओ अतिशय़ व्हायरल होत आहे. या महिलेचे वय आणि तिने स्केटिंगमध्ये मिळवलेली मास्टरी हा सध्या चर्चेचा विषय ठऱत असून नेटकरी या महिलेच्या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.

इतर बातम्या :

Video | मग्न असल्याचे बघताच सिंहिणीचा अचानपणे हल्ला, हत्तीने पुढे काय केले ? एकदा पाहाच

Video | मोठ्या थाटात फुटबॉलला लाथ मारायला निघाला, मध्येच कुत्र्याने दिली जोरदार धडक

Video | डान्सरलाही लाजवेल असा जबरदस्त डान्स, दोन लहान मुलींचा व्हिडीओ एकदा पाहाच

(women 46 year old skating very smoothly video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI