Video | मोठ्या थाटात फुटबॉलला लाथ मारायला निघाला, मध्येच कुत्र्याने दिली जोरदार धडक

हा व्हिडीओ पाहून अनेकांना हसू आवरलेलं नाही. या व्हिडीओमध्ये फुटबॉलला किक मारणाऱ्या एका तरुणाची चांगलीच फजिती झाली आहे.

Video | मोठ्या थाटात फुटबॉलला लाथ मारायला निघाला, मध्येच कुत्र्याने दिली जोरदार धडक
dog accident viral photo

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. या मंचावर कधी प्राणी तर कधी पक्ष्यांचे व्हिडीओ व्हायरल होतात. सध्या तर एक अतिशय मजेदार व्हिडीओ चर्चत आला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना हसू आवरलेलं नाही. या व्हिडीओमध्ये फुटबॉलला किक मारणाऱ्या एका तरुणाची चांगलीच फजिती झाली आहे. (young boy kicked his football and at same time dog also kicked him see video quickly)

तरुणाने फुटबॉलला लाथ मारताच कुत्र्याने दिली धडक

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा अतिशय विशेष आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण फुटबॉलसोबत खेळत असल्याचे आपल्याला दिसते आहे. तो अतिशय आनंदात फुटबॉल खेळतो आहे. तसेच खेळत असताना त्याने अचानकपणे या फुटबॉलला जोरात लाथ मारली आहे. मात्र, यावेळी फुटबॉलला मारल्यानंतर काही क्षणात या तरुणाच्या मागून एक कुत्रा आला आहे. या कु्त्र्याने तरुणाला थेट धडक दिली आहे. ही धडक एवढी जोरदार आहे की ज्यामुळे हा तरुण थेट हवेत उडाला आहे. तसचे हवेत उडाल्यामुळे तो थेट जमिनीवर आदळला आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर तो चांगलाच व्हायरल होत आहे. लोक या व्हिडीओला पाहून मजेदार कमेंट्स करत आहेत. तसेच याव्हिडीओला रिट्विटसुद्धा करत आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला ‘@fred035schultz’ या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Video | डान्सरलाही लाजवेल असा जबरदस्त डान्स, दोन लहान मुलींचा व्हिडीओ एकदा पाहाच

Video | पाळत ठेवत असल्याचे समजताच कुत्रा खवळला, एका क्षणात ड्रोनला पाडलं, पाहा व्हायरल व्हिडीओ

Video | काचेच्या बॉटलवर तरुणीकडून योगा करण्याचा प्रयत्न, मध्येच घडलेल्या घटनेमुळे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

(young boy kicked his football and at same time dog also kicked him see video quickly)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI