World Rabies Day 2022: उद्या जागतिक रेबीज दिवस, काय आहे या दिवसाचे महत्त्व?

उद्या जागतिक रेबीज दिवस आहे. हा दिवस का साजरा करण्यात येतो आणि कुणाच्या स्मरणार्थ साजरा करण्यात येतो याबद्दल जाणून घेऊया

World Rabies Day 2022: उद्या जागतिक रेबीज दिवस, काय आहे या दिवसाचे महत्त्व?
जागतिक रेबीज दिन Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 27, 2022 | 7:25 PM

मुंबई, रेबीजबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी आणि  या प्राणघातक आजारापासून लोकांना वाचवण्यासाठी दरवर्षी 28 सप्टेंबर रोजी जगभरात रेबीज दिन (World Rabies Day 2022) साजरा केला जातो. हा दिवस फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ लुई पाश्चर (louis Pasteur) यांची पुण्यतिथी आहे, ज्यांनी 1885 मध्ये रेबीजची पहिली लस विकसित केली. आज ही लस प्राण्यासाठी आणि माणसांसाठी महत्त्वाची आहे. यामुळे रेबीज विषाणूमुळे होणारा धोका कमी होतो. यावर्षी 16 वा जागतिक रेबीज दिन साजरा केला जाणार आहे. रेबीज दिन दरवर्षी नवीन थीमसह (World Rabies Day 2022 theme) साजरा केला जातो आणि यावर्षीची थीम ‘रेबीज: वन हेल्‍थ, जीरो डेथ्‍स’ आहे. ही थीम मानव आणि प्राणी यांच्यातील संबंधांवर प्रकाश टाकणारी आहे.

 कुत्रा चावल्याने होतो रेबीज रोगाचा प्रसार

डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, विषाणूची लागण झालेल्या प्राण्यांच्या चाव्याव्दारे रेबीजचा संसर्ग माणसामध्ये होतो. हा एक संसर्गजन्य रोग आहे जो संक्रमित मांजरी, कुत्रे आणि माकडांच्या चाव्याव्दारे मानवांमध्ये संक्रमित होऊ शकतो. यामुळे मेंदूमध्ये इजा देखील होऊ शकते. असे मानले जाते की 99 टक्के प्रकरणांमध्ये रेबीजचा संसर्ग कुत्र्यांमुळे मानवांमध्ये होतो, त्यामुळे रेबीजमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

असा आहे रेबीज लसीचा इतिहास

जागतिक रेबीज दिन 28 सप्टेंबर 2007 मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात WHO, अमेरिका आणि अलायन्स फॉर रेबीज कंट्रोल आणि सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन यांनी प्रामुख्याने सहभाग घेतला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश जगभरातील लोकांना रेबीजचे धोके आणि लसीचे फायदे याबद्दल जागरुक करणे हा होता.

हे सुद्धा वाचा

हळूहळू या संस्थांनी जगभरात अनेक कार्यक्रम आयोजित केले आणि लोकांना त्यांच्याशी जोडण्याचे काम केले. तेव्हापासून दरवर्षी 28 सप्टेंबरला रेबीज दिन साजरा केला जाऊ लागला. जागतिक रेबीज दिनानिमित्त जागतिक आरोग्य संस्था या आजाराचे दुष्परिणाम आणि ते टाळण्यासाठी विविध मार्गांबद्दल जनजागृती मोहीम राबवते.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.