AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

10 वर्षे, 6 गर्लफ्रेंड…पोपट आणि कॅलेंडरने मुलींना फसवायचा, पण एका कुत्र्याने खेळ संपवला..

एक तरुणाने त्याला गर्लफ्रेंड असतानाही दहा वर्षे एकाच वेळी अनेक तरुणींना आपल्या जाळ्यात ओढले होते. आपली चलाखी लपवण्यासाठी त्याने एका पोपटाला ट्रेनिंग दिली होती. पण त्याचे हे उद्योग एका कुत्र्याने उघड केले.

10 वर्षे,  6 गर्लफ्रेंड…पोपट आणि कॅलेंडरने मुलींना फसवायचा, पण एका कुत्र्याने खेळ संपवला..
प्रतिकात्मक फोटो
| Updated on: Sep 09, 2025 | 9:58 PM
Share

एक प्रियकर त्याच्या प्रेयसीला तब्बल दहा वर्षे धोका देत होता आणि या दरम्यान तो अन्य सहा तरुणींना डेट करत होता. त्याने आपली ही लांडी-लबाडी लपवण्यासाठी एक विशेष सिस्टीम करुन ठेवली होती. परंतू या लखोबा लोखंडे याचा डाव एका कुत्र्याने उलटवला… कसा ते पाहणे मजेशीर आहे.

हा चमत्कारीक प्रकार ब्रिटनच्या डॅनी नावाच्या एका तरुणाने केला होता. तब्बल दहा वर्षे त्याच्या गर्लफ्रेंडला धोक्यात ठेवून एकाच वेळी सहा वेगवेगळ्या तरुणींसोबत नाते कायम ठेवले होते. डॅनी याने हे सर्वकाही एका खेळासारखे सुरु ठेवले होते. आपला खोटेपणा लपवण्यासाठी त्याने एक कलर कोडेड कॅलेंडर तयार केले होते, तीन फोन देखील त्याच्याकडे होते आणि एका पोपटाची देखील त्याने या कामी मदत घेतली होती.

‘द सन’ या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार ३८ वर्षीय डॅनी आपल्या सर्व प्रेमीकांना मॅनेज करण्यासाठी एक कलर – कोडेड कॅलेंडरचा वापर केला होता. यात वेग-वेगळे रंग हे निश्चित करायचे की कोणत्या दिवशी कोणत्या मुलीला भेटायचे. तसेच गर्लफ्रेंडचे तिच्या फोनवरुन लक्ष हटवण्यासाठी त्याने एका पोपटाला खास प्रशिक्षण दिले होते. जेव्हा त्याच्या फोनवर कोणतेही नोटिफीकेशन यायचे, तेव्हा नेमका पोपट विचित्र आवाज काढायला सुरुवात करायचा. त्यामुळे मुलींचे फोन ऐवजी पोपटाकडे लक्ष जायचे.

डॅनी तीन फोनचा वापर करायचा. एक फोन नॉर्मल कॉल्ससाठी आणि इतर दोन फोन तो चिप्सचे डब्बे आणि नकली रोपट्याच्या कुंडीत लपवून ठेवायचा. एकदा तर त्याने प्रेयसीच्या संशय येऊ नये म्हणून आपल्या घरातील बॉयलरचे प्रेशर कमी केले होते.

कुत्र्याने डॅनीचा हा सारा खेळ उलटवला

परंतू एक कुत्र्याने डॅनीचा हा सारा खेळ उलटवून टाकला आणि त्याला उघडेपाडले. दहा वर्षांचा त्याचा हा खेळ संपला. त्याचे झाले का त्याच्या एका गर्लफ्रेंडकडे कॉकपू जातीचा एक कुत्रा होता. जेव्हा तो त्याच्या पहिल्या गर्लफ्रेंडकडे परतला, तेव्हा त्याच्या शर्टावर कुत्र्याचे काही केस चिकटले होते आणि त्याच्या या गर्लफ्रेंडला कुत्रे अजिबात म्हणजे अजिबात पसंत नव्हते. त्यामुळे तिला डॅनीवर संशय आला आणि तिने प्रश्नांची सरबत्ती केली आणि त्याचे सगळे डाव उघड झाले.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.