AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रीलचा नाद बेक्कार ! 22 वर्षांच्या YouTuber सोबत जे झालं ती वेळ तुमच्यावरही येऊ शकते..

ओडिशामध्ये, 22 वर्षीय युट्यूबर सागर हा त्याच्या चॅनेलसाठी धबधब्यावर व्हिडिओ शूट करत होता, मात्र तेव्हाच पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला. आणि अचानक... व्हायरल झालेल्या या व्हिडीओने सगळ्यांची झोप उडाली आहे.

रीलचा नाद बेक्कार ! 22 वर्षांच्या YouTuber सोबत जे झालं ती वेळ तुमच्यावरही येऊ शकते..
रील्सचा नाद पडला महागातImage Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Aug 25, 2025 | 12:51 PM
Share

सध्याच्या स्मार्टफोनच्या जमान्यात सोशल मीडिया आणि रीलचं प्रचंड वेड आहे. बरेच लोक तासन्तास रील्स पहात असतात. आणि त्यांना मिळणारे लाईक्स, व्ह्यूज पाहून अनेक लोकं, यूट्यूबर्सही सतत रील्स बनवताना दिसतात. मात्र लाईक्स, व्ह्यूजसाठी रील्स बनवण्याच्या नादात ते त्यांच्या जीवाचीही पर्वा करत नाहीत आणि असं काही घडून बसतं ज्यामुळे क्षणात होत्याचं नव्हतं होतं. असाच काहीसा प्रकार आता समोर आला आहे. रील बनवण्याचा नाद एका 22 वर्षांच्या यूट्यूबरला प्रचंड महागात पडला.

धबधब्यावर व्हिडिओ शूट करत असताना, पाण्याचा प्रवाह अचानक वाढला आणि एका झटक्यात त्या तो तरूण वाहून नेले. ही हृदयद्रावक घटना ओडिशाच्या कोरापूट जिल्ह्यातील दुदुमा धबधब्यावर घडली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे, त्याचा व्हिडिओ आता इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे.

रील्स काढत नाचत होता अन्..

गंजम जिल्ह्यातील बेरहमपूर येथील रहिवासी असलेला युट्यूबर सागर टुडू त्याच्या मित्रासोबत त्याच्या चॅनेलसाठी दुडा धबधब्यावर व्हिडिओ शूट करण्यासाठी गेला होता. दोघेही ड्रोन कॅमेऱ्याने सुंदर दृश्ये टिपत होते. दरम्यान, सागर एका मोठ्या दगडावर उभा राहिला आणि व्हिडिओ शूट करू लागला. मात्र त्यानंतर माचकुंड धरणातून अचानक पाणी सोडल्यामुळे धबधब्यातील पाण्याचा प्रवाह खूप वेगवान झाला आणि सागर त्या पाण्यातून वाहून गेला.

या घटनेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय. पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता की युट्यूबर, सागरला सावरण्याची संधीही मिळाली नाही आणि तो पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला, व्हिडीओत ते स्पष्टपणे दिसून येतंय. तो पाण्यात वाहून गेल्याचे पाहून त्याचा मित्र आणि तिथे उपस्थित असलेले इतर लोक त्याला वाचवण्यासाठी ओरडत राहिले, परंतु पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की कोणीही त्याच्या जवळ जाण्याचे धाडस करू शकले नाही.

@viprabuddhi X (पूर्वीचे ट्विटर) या हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यासोबत यूजरने लिहीलं की, व्हिडिओ शूट करताना, 22 वर्षीय युट्यूबर कोरापूटच्या दुदुमा धबधब्यात वाहून गेला. हा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे, ज्यावर नेटिझन्सने विविध कमेंट्स केल्या आहेत.

इथे पहा व्हिडीओ

वाहून गेलेल्या तरूणाचा अजून काहीच पत्ता नाही

दरम्यान तरूण वाहून गेल्याच्या या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच, स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. सध्या बचाव कार्य सुरू आहे. अद्याप युट्यूबरचा कोणताही पत्ता लागलेला नाही.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.