Zomato Boy On Wheelchair: हा झोमॅटो बॉय व्हीलचेअरवर सगळीकडे फिरतो! सोशल मीडियावर कौतुकचा वर्षाव, झोमॅटोचंही कौतुक!

त्याचबरोबर झोमॅटोने या माणसाला नोकरी दिल्याबद्दल झोमॅटोचंही कौतुक करत आहे. ही व्यक्ती ज्या पद्धतीने आपल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहे, ते कौतुकास पात्र आहे. त्याचबरोबर छोट्या-छोट्या अडचणींवर हार मानणाऱ्यांसाठी ही प्रेरणा आहे.

Zomato Boy On Wheelchair: हा झोमॅटो बॉय व्हीलचेअरवर सगळीकडे फिरतो! सोशल मीडियावर कौतुकचा वर्षाव, झोमॅटोचंही कौतुक!
Zomato Boy ViralImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 29, 2022 | 11:37 AM

Zomato Boy On Wheelchair: सोशल मीडियावर असे काही वेळा व्हिडिओ पाहायला मिळतात जे त्यांना भावनिक असतात. एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात एक व्यक्ती व्हीलचेअरवर जमोटो फूड डिलिव्हरीसाठी जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी चांगलेच भावूक होत आहेत. त्याचबरोबर लोकही या व्यक्तीच्या भावनेला सलाम करत आहेत. त्याचबरोबर झोमॅटोने या माणसाला नोकरी दिल्याबद्दल झोमॅटोचंही कौतुक करत आहे. ही व्यक्ती ज्या पद्धतीने आपल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहे, ते कौतुकास पात्र आहे. त्याचबरोबर छोट्या-छोट्या अडचणींवर हार मानणाऱ्यांसाठी ही प्रेरणा आहे.

डिलिव्हरी बॉय व्हीलचेअरवर

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती व्हीलचेअरवर बसलेली आहे. ही मोटरसायकलसारखी व्हीलचेअर आहे जी बहुधा इंजिनवर चालते. या व्यक्तीने झोमॅटो टी-शर्ट घातला आहे आणि व्हीलचेअरच्या मागील बाजूस झोमॅटो बॉक्स देखील आहे. हे मार्केटसारखे ठिकाण दिसत असून कुणीतरी मागून त्या व्यक्तीचा व्हिडिओ बनवला आहे, त्यामुळे त्या व्यक्तीचा चेहरा व्हिडिओत दिसत नाही. तो रस्त्यावर आपल्या व्हीलचेअरवर बसलेला दिसतो.

व्हिडीओ

व्हिडिओ पाहून यूजर्स झाले भावूक

हा व्हिडिओ कुठे आणि कधीचा आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. इन्स्टाग्रामवर groming_bulls_ नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “प्रेरणेसाठी उत्तम उदाहरण.” हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. आतापर्यंत ११ दशलक्षाहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. या व्हिडिओला 14 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया यूजर्स भावूक होत असून त्यावर आपल्या प्रतिक्रियाही देत आहेत.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.