Government Scheme : रिस्क फ्री, टॅक्स फ्री, ही योजना कोणती? या सरकारी योजनेत तीन पट परतावा

Government Scheme : सरकारच्या या योजनेत कोणतीही जोखीम तर नाहीच उलट कर सवलतही मिळते. या योजनेत गुंतवणुकीवर जोरदार परतावा मिळतो. या निधीतून मुलांचे शिक्षण आणि लग्न कार्यही होऊ शकते.

Government Scheme : रिस्क फ्री, टॅक्स फ्री, ही योजना कोणती? या सरकारी योजनेत तीन पट परतावा
Follow us
| Updated on: Feb 22, 2023 | 9:34 PM

नवी दिल्ली : मुलांचे शिक्षण असो वा लग्न त्यासाठी मोठ्या निधीची गरज असते. प्रत्येक आई-वडिलांना त्यांच्या मुलांच्या प्रगतीची चिंता असतेच. त्यासाठी ते नाना खटाटोप करतात. प्रसंगी बँकेकडून कर्जही घेतात आणि लाडक्यांचे स्वप्न पूर्ण करतात. परंतु, जर तुम्ही वेळीच या सरकारी योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. तुम्हाला कर्ज घेण्याची गरज ही पडण्याची शक्यता नाही. विशेष म्हणजे ही योजना कर मुक्त (Tax Free) तर आहेच पण जोखीम मुक्तही (Risk Free) आहे. या योजनेत तुम्हाला परतावा ही जोरदार मिळतो. मुले मोठे झाले की त्यांच्यासाठी मोठा निधी उपलब्ध होतो. मुदत ठेव आणि आवर्ती ठेव योजनेपेक्षा या योजनेत मोठा परतावा मिळतो. सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana-SSY) तुम्हाला 3 पट परतावा मिळण्याची हमी मिळते.

सुकन्या समृद्धी योजनेवर सध्या वार्षिक 7.6 व्याज मिळते. इतर अल्प बचत योजना जशा एफडी (FD), आरडी (RD), एनएससी (NSC) आणि पीपीएफच्या (PPF) तुलनेत हे व्याज जास्त आहे. योजनेत दरवर्षी कमीत कमी 250 रुपये आणि अधिकत्तम 1.50 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. ही गुंतवणूक तुम्हाला मासिक आधारवरही करता येईल. ही योजना पोस्ट खात्यातून चालविण्यात येत असल्याने तुमचा पैसा 100 टक्के सुरक्षित राहील.

सुकन्या समृद्धी योजना दीर्घकालीन गुंतवणुकीला प्रोत्साहन देते. या योजनेची मॅच्युरिटी 21 वर्षे आहे. तुमच्या मुलीचे वय 3 वर्षे असेल तर ही योजना तिच्या 24 वर्षी मॅच्युअर होईल. तुमची मुलगी एक वर्षांची असेल तर ही योजना तिच्या 22 व्या वर्षी मॅच्युअर होईल. या योजनेत तुम्हाला केवळ 15 वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. उर्वरीत 6 वर्षात तुमच्या गुंतवणुकीवर व्याज मिळत राहते. या योजनेत कंपाऊंडिंगचा फायदा होतो.

हे सुद्धा वाचा

ही योजना कर मुक्त आहे. या योजनेवर EEE म्हणजे तीन वेगवेगळ्या स्तरावर कर सवलत मिळते. पहिली सवलत प्राप्तिकर कायदाच्या कलम 80 सी अंतर्गत 1.50 लाख रुपयांपर्यंत वार्षिक सवलत मिळते. या योजनेच्या परताव्यावर कर सवलत मिळते. तर तिसऱ्या वेळी मॅच्युरिटीवर मिळालेल्या रक्कमेवर कर सवलत मिळते.

या योजनेत तुम्ही मुलीच्या लग्नासाठी मॅच्युरिटीपूर्वी 50 टक्के रक्कम काढता येते. याशिवाय खाते सुरु झाल्यानंतर 5 वर्षांनी काही महत्वाच्या परिस्थितीत मॅच्युरिटीपूर्वी रक्कम काढता येते. जर खातेदाराचा अचानक मृत्यू झाल्यास मॅच्युरिटीपूर्वी रक्कम काढता येते.

SSY वर व्याज : 7.6 टक्के वार्षिक अधिकतम गुंतवणूक : 1.50 लाख रुपये वार्षिक 15 वर्षातील गुंतवणूक : 22,50,000 रुपये 21 वर्षांची मॅच्युरिटीवरील एकूण रक्कम : 63,65,155 रुपये व्याजाचा फायदा : 41,15,155 रुपये

Non Stop LIVE Update
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.