Aadhaar Card यूजर्सना मोठा दिलासा…आता या तारखेपर्यंत करु शकतात फ्री अपडेट

Aadhaar Free Update Deadline Extend : आधार कार्ड फ्री मध्ये अपडेट करण्याची डेडलाइन पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. ही डेडलाइन संपल्यानंतर आधार कार्ड अपडेट करण्याचा खर्च किती असेल? तुम्ही तुमचे ऑनलाइन आधार कसे अपडेट करु शकता?

Aadhaar Card यूजर्सना मोठा दिलासा...आता या तारखेपर्यंत करु शकतात फ्री अपडेट
aadhar card
Follow us
| Updated on: Sep 14, 2024 | 1:14 PM

आधार कार्ड (Aadhaar Card) होल्डर्ससाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आधार यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे UIDAI ने आधार कार्डला फ्री मध्ये अपडेट करण्याची डेडलाइन वाढवली आहे. आता 14 डिसेंबर 2024 पर्यंत तुम्ही हे काम मोफत करु शकता. ही डेडलाइन आज संपत होती. पण अथॉरिटीने आधार अपडेट आणखी तीन महिन्यांसाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने 10 वर्ष आणि त्याआधी बनवण्यात आलेल्या आधार कार्डांना फ्री अपडेटची सुविधा दिली आहे. त्याची डेडलाइन आज संपत होती. ही डेडलाइन वाढवण्यात आली आहे. याआधी सुद्धा फ्री मध्ये हे काम करण्याची लास्ट डेट अनेकदा वाढवण्यात आली आहे.

याआधी 14 मार्चपासून 14 जून 2024 पर्यंत तारीख वाढवण्यात आली. त्यानंतर पुन्हा डेडलाइन वाढवून 14 सप्टेंबर करण्यात आली. आता पुन्हा एकदा तीन महिन्यासाठी डेडलाइन वाढवण्यात आली आहे. युजर्स 14 डिसेंबरपर्यंत फ्री मध्ये हे काम करु शकतात. UIDAI ने सोशल मीडियावर ही माहिती दिली व एक्स हँडलवर पोस्ट केलीय.

डेडलाइन नंतर आधार कार्ड अपडेटचा खर्च किती?

आधार कार्ड फ्री मध्ये अपडेट करण्याची मुदत संपल्यानंतर अपडेट करण्यासाठी तुम्हाला UIDAI द्वारा निश्चित केलेले शुल्क भरावे लागेल. हा खर्च 50 रुपये आहे. यूआयडीएआय द्वारा देण्यात येणारी आधार कार्ड अपडेट करण्याची ही फ्री सर्विस केवळ myAadhaar Portal वर उपलब्ध आहे.

असे ऑनलाइन डिटेल अपडेट करा

UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ वर लॉग इन करा.

होमपेज वर माय आधार पोर्टलवर जा. रजिस्‍टर मोबाइल नंबरवर आलेला ओटीपी युज करुन लॉग इन करा.

त्यानंतर आपल्या डिटेल तपासा. जर डिटेल योग्य असतील, तर योग्यवाल्या बॉक्‍सवर टिक करा.

डेमोग्राफिक माहिती चुकीची मिळाल्यानंतर ड्रॉप-डाऊन मेनूव्दारे ओळख कागदपत्रांचा ऑप्शन क्लिक करा आणि डॉक्‍यूमेंट अपलोड करा.

इथे कागदपत्र तुम्ही जेपीजी, पीएनजी आणि पीडीएफ स्वरुपात अपलोड करु शकता.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.