मुंबईत 41 हजार, तर पुण्यात 10 हजार घरांचं बांधकाम रखडलं, 50 हजार कोटींची कामं थांबली!

सर्वाधिक हाऊसिंग प्रकल्प रखडलेल्या शहरांमध्ये पहिला क्रमांक दिल्ली एनसीआरचा (Delhi NCR) लागतो. त्यानंतर मुंबई (Mumbai), पुणे (Pune), हैदराबाद (Hyderabad), बंगळुरू (Bangalore), कलकत्ता (Calcutta)  शहरांचा नंबर आहे.

मुंबईत 41 हजार, तर पुण्यात 10 हजार घरांचं बांधकाम रखडलं, 50 हजार कोटींची कामं थांबली!
रिअल इस्टेटला सुगीचे दिवस! स्टॅम्प ड्युटी सवलतींमुळे मालमत्तांचे रजिस्ट्रेशन दुप्पटीने वाढले
Follow us
| Updated on: Aug 09, 2021 | 1:26 PM

नवी दिल्ली : देशात मागच्या काही वर्षांत रियल इस्टेट (Real Estate) काहीसा मंदावल्याचं चित्र आहे. त्यात कोरोना महामारीने (Corona Pandemic) तर संपूर्ण देशातल्या रियल इस्टेट उद्योगाला मोठा झटका दिला. गेल्या दीड ते दोन वर्षात या उद्योगाने मोठा तोटा सहन केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण देशात 1 लाख 40 हजार 613 कोटी रुपयांचे हाऊसिंग प्रकल्प (Housing Projects) रखडले आहेत. यामध्ये तब्बल 1.74 लाख फ्लॅट्स आहेत. ही संख्या केवळ देशातल्या 6 प्रमुख शहरांमधली आहे. Anarock च्या एका रिपोर्टमधून ही आकडेवारी समोर आली आहे. या रिपोर्टनुसार, बिल्डरांकडे आपले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पुरेसा निधी नसल्याने हे प्रकल्प रखडले आहेत. (As builders do not have funds to complete the projects, housing projects worth Rs 1 lakh 40 thousand crore are stalled in major cities in India)

रखडलेले सर्वाधिक प्रकल्प दिल्लीत

सर्वाधिक हाऊसिंग प्रकल्प रखडलेल्या शहरांमध्ये पहिला क्रमांक दिल्ली एनसीआरचा (Delhi NCR) लागतो. त्यानंतर मुंबई (Mumbai), पुणे (Pune), हैदराबाद (Hyderabad), बंगळुरू (Bangalore), कलकत्ता (Calcutta)  शहरांचा नंबर आहे. टक्केवारीचा विचार केला तर एकट्या दिल्लीत देशातले 66 टक्के प्रकल्प रखडले आहेत. यामध्ये 1 लाख 13 हजार 860 फ्लॅट्सचं बांधकाम थांबलंय. ज्यांची किंमत 86 हजार 463 कोटींच्या घरात आहे. यामध्ये 50 टक्के मिड सेगमेंट, 24 टक्के अफोर्डेबल सेगमेंट आणि 6 टक्के लक्झरी सेगमेंटमधली घरं आहेत. रिपोर्टनुसार, ज्या ग्राहकांनी घरं बुक केली आहेत त्यांना घरं मिळण्यासाठीही विलंब होत आहे.

मुंबई-पुण्यात काय आहे परिस्थिती?

मुंबई आणि उपनगरांमध्ये (Mumbai Suburban) 41 हजार 720 फ्लॅट्सचं काम रखडलं आहे. यांची एकत्रित किंमत 42 हजार 417 कोटी रुपये आहे. दिल्ली एनसीआरनंतर MMRDA भागात सर्वाधिक 24 टक्के प्रकल्प रखडले आहेत. यामध्ये 37 टक्के लक्झरी फ्लॅट्स आहेत. या प्रकारातल्या फ्लॅट्ससाठी सर्वाधिक पैसे मोजावे लागतात आणि मुंबईत रखडलेल्या प्रकल्पांमध्ये लक्झरी फ्लॅट्स सर्वाधिक आहेत. यानंतर परवडणाऱ्या घरांच्या प्रकारातले 22 टक्के आणि प्रीमीयम प्रकारातले 21, मध्यम प्रकल्पातले 20 टक्के फ्लॅट्सचं काम बंद पडलं आहे. पुण्याचं चित्र पाहिलं तर पुण्यात सुमारे 10 हजार फ्लॅट्सचं काम थांबलं आहे. यामध्ये बिल्डरांचे 5 हजार 854 कोटी रुपये अडकले आहेत.

हैदराबाद, बंगळुरू आणि कलकत्त्यालाही फटका

पुण्यानंतर हाऊसिंग प्रकल्प रखडलेल्या शहरांच्या यादीतर हैदराबादचा नंबर आहे. हैदराबादमध्ये 2 हजार 727 कोटी रुपयांचे 4 हजार 150 प्लॅट्सचं काम रखडलं आहे. देशाचं आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरूमध्ये 3 हजार 879 फ्लॅट्सचं काम थांबलं आहे ज्याची किंमत 3 हजार 61 कोटींच्या घरात आहे. यामध्ये सर्वाधिक घरं ही मध्यम प्रकारातली आहेत. या सर्व शहरांच्या तुलनेत कलकत्ताची स्थिती चांगली आहे. कलकत्त्यात 150 प्रकल्पांचं काम थांबलंय आणि त्याची किंमत 91 कोटी आहे. कलकत्त्यात ज्या फ्लॅट्सचं काम थांबलं आहे त्यांची सरासरी किंमत 80 लाखांच्या घरात आहे. (As builders do not have funds to complete the projects, housing projects worth Rs 1 lakh 40 thousand crore are stalled in major cities in India)

संबंधित बातम्या :

ईएमआय फ्री लोन म्हणजे काय? दर महिन्याला हप्ता फेडण्याची चिंताच उरणार नाही

सर्वाधिक व्याज देणाऱ्या पाच टॉप RD स्कीम; 50 रुपयांमध्ये खाते उघडा, 8 टक्के व्याज मिळवा

व्होडाफोन आयडिया बुडाली तर सरकारलाही 1.6 लाख कोटींचं नुकसान, जाणून घ्या कसं?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.